लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : होळीच्या सणादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून मुंबई ते नागपूर / मडगाव / नांदेड आणि पुणे – नागपूर दरम्यान २८ होळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी – नागपूर – सीएसएमटी द्वि-साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या ८ फेऱ्या धावतील. गाडी क्रमांक ०२१३९ ही द्वि-साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी सीएसएमटी येथून ९ मार्च, ११ मार्च, १६ मार्च आणि १८ मार्च रोजी रात्री १२.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी ३.१० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०२१४० ही द्वि-साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी नागपूर येथून ९ मार्च, ११ मार्च, १६ मार्च आणि १८ मार्च रोजी रात्री ८ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला एक प्रथम वातानुकूलित, एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, १० तृतीय वातानुकूलित, ४ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन असतील. या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापुर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे असतील.

सीएसएमटी – मडगाव – सीएसएमटी साप्ताहिक विशेष ४ फेऱ्या धावतील. गाडी क्रमांक ०११५१ साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी सीएसएमटी येथून ६ मार्च आणि १३ मार्च रोजी रात्री १२.२० वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५२ ही साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी मडगाव येथून ६ मार्च आणि १३ मार्च रोजी दुपारी २.१५ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी रात्री ३.४५ वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला एक प्रथम वातानुकूलित, एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, १० तृतीय वातानुकूलित, ४ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन असतील. या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि येथे थांबा असेल.

एलटीटी- मडगाव – एलटीटी साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या ४ फेऱ्या धावतील. गाडी क्रमांक ०११२९ साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १३ मार्च आणि २० मार्च रोजी २२.१५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११३० ही साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी १४ मार्च आणि २१ मार्च रोजी मडगाव येथून दुपारी २.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला एक प्रथम वातानुकूलित, २ वातानुकूलित द्वितीय, सहा वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान,१ पॅन्ट्री कार आणि २ जनरेटर कार असतील. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे थांबा असेल.

एलटीटी – हुजूर साहिब नांदेड – एलटीटी साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या ४ फेऱ्या धावतील. गाडी क्रमांक ०११०५ लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२ मार्च, १९ मार्च रोजी रात्री १२.५५ वाजता सुटेल आणि नांदेड येथे रात्री ९ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११०६ ही रेल्वेगाडी नांदेड येथून १२ मार्च आणि १९ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.०५ वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला एक प्रथम वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ४ सेकंड सीटिंग, १ पॅन्ट्री, १ जनरेटर व्हॅन आणि १ सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅन असतील. या रेल्वेगाडीला ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, बारसी टाउन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी, गंगाखेड, परभणी आणि पूर्णा येथे थांबा असेल. तर, पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या ८ फेऱ्या धावतील.