महारेराच्या प्रशिक्षणांतर्गत स्थावर संपदा क्षेत्रातील दलालांच्या ६ ऑगस्टला झालेल्या दुसऱ्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून  ३०१०  पैकी २८१२ उमेदवार यशस्वी झाले आहेत. दुसऱ्या परीक्षेचा निकाल ९४ टक्के लागला आहे. पहिल्या परीक्षेचा निकाल ९६ टक्के लागला होता. पहिल्या परीक्षेला ४२३ उमेदवार परीक्षेला बसले होते आणि ४०५ यशस्वी झाले होते. यावेळी तब्बल सातपट म्हणजे ३०१० उमेदवार परीक्षेला  बसले आणि २८१२ यशस्वी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> जुहू चौपाटीवर सहा जणांना जेलीफिशचा दंश

मालमत्ता खरेदी-विक्री ही मोठ्या प्रमाणात दलालांच्या माध्यमातून केली जाते. मात्र दलालांसाठी कोणतेही प्रशिक्षण नसल्याने अनेकदा त्यांच्याकडून ग्राहकांची फसवणूक होते. या पार्श्वभूमीवर महारेराने विशिष्ट प्रशिक्षणाच्या आधारे परीक्षा देऊन प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार १ सप्टेंबरपासून हे प्रमाणपत्र दलालांना महारेरा नोंदणीसाठी बंधनकारक आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने महारेराने प्रशिक्षण आणि परीक्षा सुरु केली आहे. दुसऱ्या परीक्षेला ३०१० दलाल बसले होते. त्यातील २८१२ जण उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी उमेदवारांत २८१२ पैकी ११८ उमेदवार हे ६० वर्षांवरील आहेत. यात सात महिला असून एकूण २८१२ यशस्वी उमेदवारांत ३६० महिलांचा समावेश आहे.  मुंबई, पुण्यासह पंढरपूर, लातूर, जळगाव, धुळे, अमरावती, अकोला, नगर, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, सांगली , सातारा , सोलापूर भागातील दलाल परीक्षेला बसले होते

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2812 out of 3117 candidates passed in real estate agents exam mumbai print news zws
Show comments