लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : वांद्रे पश्चिम येथील माऊंट मेरी जत्रा १० सप्टेंबरपासून सुरू होत असून १७ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या जत्रेला भेट देणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी बेस्ट उपक्रमाने संपूर्ण आठवडाभर वांद्रे स्थानक (प,) ते हिल रोडदरम्यान २८७ अतिरिक्त बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा-घरांचा साठा रोखणारा ‘म्हाडा’ निर्णय रद्द करण्याचा गृहनिर्माण विभागाचा प्रस्ताव

माऊंट मेरी जत्रेनिमित्त माऊंट मेरी चर्च, तसेच फादर ॲग्नल आश्रम परिसरात मोठ्या संख्येने नागरिक येतात. बहुसंख्य नागरिक लोकलने वांद्रे स्थानकात उतरतात आणि तेथून बेस्ट बसमधून जत्रास्थळी पोहोचतात. मात्र बसगाड्यांचे प्रवर्तन माऊंट मेरी चर्चपर्यंत करणे शक्य होत नाही. परिणामी, जत्रा कालावधीत सोडण्यात येणाऱ्या अतिरिक्त बसगाड्या वांद्रे रेल्वे स्थानक (प.) आणि हिल रोड उद्यानदरम्यान धावणार आहेत. याव्यतिरिक्त वांद्रे परिसरातून प्रवर्तित होणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या नियमित बसमार्गावरही अतिरिक्त बसगाड्या प्रवर्तित करण्यात येणार आहेत. जत्रेनिमित्त वांद्रे स्थानक (प.) आणि माऊंट मेरी चर्च परिसरात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन त्यांना मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी बस निरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, असे बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 287 additional buses of best will run on the occasion of mount mary fair mumbai print news mrj
Show comments