लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यातील करोना रुग्णांची संख्या आटोक्यात असून, रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात बुधवारी २९९ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली तर ७१० रुग्ण बरे झाले. त्यामुळे करोना रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. तसेच करोनामुळे मुंबईमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यात बुधवारी २९९ करोना रुग्णांची नोंद झाली असून ७१० रुग्ण बरे झाले.

patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Two hundred patients of hair loss problem ICMR team in Shegaon
केसगळतीचे रुग्ण दोनशेच्या घरात; ‘आयसिएमआर’चे पथक शेगावात…
1.5 thousand people committed suicide in Vasai Bhayander in 5 years
५ वर्षात वसई, भाईंदर मध्ये दिड हजार जणांच्या आत्महत्या;२०२४ मध्ये गळाफास घेऊन सर्वाधिक आत्महत्या
Mumbai Nashik highway accident near Gogethar killed three including couple from Amalner
अमळनेरमधील दाम्पत्याचा शहापूरजवळील अपघातात मृत्यू
Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
Nandurbar district nurse murder, murder Nandurbar district, Nandurbar district,
नंदुरबार जिल्ह्यातील परिचारिकेच्या हत्येची उकल
unregistered doctors , Maharashtra Medical Council,
नोंदणीकृत नसलेल्या डॉक्टरांवर नववर्षात कारवाई, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचा निर्णय

राज्यात रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ होत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१३ टक्क्यांहून ९८.१५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. राज्यात बुधवारी करोनाने एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून, हा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे. मुंबईमध्ये मृत्यू झालेली ८५ वर्षीय वयोवृद्ध महिला असून, तिला दीर्घकालीन उच्च रक्तदाबाचा त्रास होता. १ जानेवारीपासून आजपर्यंत ९८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८१ टक्के एवढा आहे.

आणखी वाचा- बेस्टला ८०० कोटींचे अर्थबळ, कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनसही मिळणार

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८ कोटी ७० लाख १३ हजार ५०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१ लाख ६६ हजार ५०६ (९.३९ टक्के) रुग्ण आढळले आहेत. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ९३९ इतकी आहे. त्याचप्रमाणे राज्यामध्ये आतापर्यंत एक्सबीबी.१.१६ या करोना उपप्रकारचे १२०२ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन टक्के प्रवाशांची करण्यात येणारी करोना चाचणीमधून बाधित आढळलेल्या १०७ प्रवाशांच्या नमूने जनुकीय क्रमनिर्धारण तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

दाखल रुग्णांची माहिती

गृहविलगीकरणात असलेले रुग्ण – ३१६३ (९५ टक्के)
रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण – १८८ (५ टक्के)
अतिदक्षता विभागात नसलेले रुग्ण – १५४ (४ टक्के)
अतिदक्षता विभागात असलेले रुग्ण – ३४ (१ टक्के)

Story img Loader