गिरगाव चौपाटी, मलबार हिलच्या खालून बोगद्यांची निर्मिती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या सागरी किनारा रस्त्यावर गिरगाव चौपाटी आणि मलबार हिलच्या खाली प्रत्येकी ३.४ किमी लांबीचे दोन बोगदे बांधण्यात येणार आहेत. बोगदा खोदणाऱ्या यंत्राद्वारे बांधण्यात येणाऱ्या बोगद्यांना जोडणारे १३ छेद बोगदे (क्रॉस टनेल) असतील.

श्यामलदास गांधी उड्डाणपूल (प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर) ते राजीव गांधी सागरी सेतूच्या (वरळी वांद्रे सी लिंक) वरळी बाजूपर्यंत बांधण्यात येणाऱ्या ९.९८ कि.मी. लांबीच्या सागरी किनारा रस्त्यांतर्गत दोन बोगद्यांची रचना करण्यात आली आहे. गिरगाव चौपाटीच्या व मलबार हिलच्या खालून हे दोन्ही बोगदे प्रियदर्शनी पार्कपर्यंत असतील. गिरगाव चौपाटीखालून सुमारे २० ते २५ मीटर खोलीवर एक बोगदा असेल, तर मलबार हिलच्या खाली सुमारे ७० ते ७५ मीटर खोलीवरून दुसरा बोगदा असणार आहे. समुद्रकिनाऱ्यालगतचे या प्रकारचे देशातील पहिलेच बोगदे आहेत. दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी ३.४५ किलोमीटर असेल. तसेच बोगद्यांचा परीघ हा ११ मीटरचा, तर बोगद्यातील रस्त्याच्या पृष्ठभागापासून बोगद्याची उंची ही ७ मीटर असणार आहे.

जाणाऱ्या, येणाऱ्या गाडय़ांसाठी दोन स्वतंत्र समांतर बोगदे असतील. भूगर्भातील व वेगवेगळ्या ऋतूंमधील वातावरणातील बदलांचा विचार करून बांधणी केली जाईल. वाहनाला आग लागण्यासारखी घटना घडल्यास तापमान सहन करण्याइतपत या बोगद्यातील भिंती सक्षम असणार आहेत.

बोगद्याची वैशिष्टय़े

* आपत्कालीन परिस्थितीमध्ये एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात जाण्यासाठी १३ छेद बोगदे असतील. दर २५० मीटर अंतरावर असणाऱ्या या छेद बोगद्यांची लांबी ही साधारणपणे ११ मीटर ते १५ मीटर असणार आहे.

* सात बोगदे हे वाहनांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी; तर उर्वरित सहा बोगदे हे प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी असणार आहेत.

* हवा खेळती राहण्यासाठी ‘सकाडरे नोझल’ ही अत्याधुनिक यंत्रणा या बोगद्यांच्या मुखांजवळ बसविली जाईल. त्यांद्वारे एका बाजूने अत्यंत तीव्रतेने हवा आतमध्ये ढकलली जाते व बोगद्याच्या दुसऱ्या बाजूने बाहेर खेचली जाते. अशी यंत्रणा भारतात प्रथमच वापरली जाईल.