उल्हासनगर, डोंबिवलीत गेल्या दोन दिवसात तीन लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. उल्हासनगर पालिकेतील स्थानिक संस्था कर विभागाचा साहाय्यक आयुक्त दीपक चिमनकारे, वसुली निरीक्षक परशुराम गायकवाड यांना एका उद्योजकाकडून एक लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. डोंबिवलीत जितेंद्र गजरे हा महावितरणचा ठेकेदार वीज मीटर बदलून देण्याच्या बदल्यात ७०० रुपयांची लाच घेताना पकडला.
चिमनकारे, गायकवाड यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. उल्हासनगरमधील दोन प्लास्टिक उद्योजकांना या दोघांनी एलबीटीप्रकरणी पालिकेत चौकशीसाठी बोलवले होते. उद्योजकांच्या चुका काढून त्यांना कारवाई टाळायची असेल तर दोन लाखाची मागणी साहाय्यक आयुक्त चिमनकारे, निरीक्षक गायकवाड यांनी त्यांच्याकडे केली. तडजोडीने ही रक्कम एक लाख रुपये देण्याचे ठरले. राधास्वामी सत्संग येथे दोघांना लाच घेताना पकडण्यात आले. उल्हासनगर पालिकेतील एलबीटी वसुलीत मोठे गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी राजकीय नेत्यांनी पालिका आयुक्तांकडे केल्या होत्या. त्याची दखल घेण्यात येत नव्हती, असे काही लोकप्रतिनिधींनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा