मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्यात असून तो ५० टक्क्यांवरून ५३ टक्के झाला आहे. जुलै २०२४पासून हा महागाई भत्ता लागू होणार असून थकबाकीच्या स्वरूपात कर्मचाऱ्यांच्या वेतनातून देण्यात येणार आहे.

केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारने हा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला. कर्मचारी संघटनांकडूनही याविषयी वारंवार मागणी करण्यात येत होती. अखेर सरकारने याविषयीचा शासन निर्णय काढला. कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात हा महागाई भत्ता थकबाकीसह मार्च महिन्याच्या वेतनात जमा होणार आहे. जवळपास १४ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यासह निवृत्तिवेतनधारकांनाही याचा लाभ मिळणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात एक टक्के महागाई भत्त्यात वाढ केल्यावर साधारणपणे १०० ते १२५ कोटींचा अतिरिक्त बोजा पडतो. तीन टक्के वाढ केल्याने ३०० ते २५० कोटींचा बोजा पडेल. एवढ्या रकमेची अर्थसंकल्पात तरतूद केलेली असते.

Story img Loader