राज्याच्या गृह विभागाने शनिवारी संध्याकाळी तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. गृहविभागाचे विशेष प्रधान सचिव भूषणकुमार उपाध्याय, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि वैध मापनशास्त्राचे नियंत्रक संजय पांडे यांचा समावेश आहे. यानुसार उपाध्याय यांची राज्याचे कारागृहाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्याय यांच्या जागी रजनीश सेठ यांची नियुक्ती झाली आहे. तर वैधमापन शास्त्राचे नियंत्रक संजय पांडे यांची गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दलाचे उपमहासमादेशक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पांडे यांनी वैधमापन विभागातील कार्यकाळात भेसळखोर व ग्राहकांना लुबाडणाऱ्या विकासकांविरोधात धडक मोहीम उघडली होती.
भूषणकुमार उपाध्याय, संजय पांडे, रजनीश सेठ यांची बदली
राज्याच्या गृह विभागाने शनिवारी संध्याकाळी तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
Updated:
First published on: 04-10-2015 at 00:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 senior ips officers including principal secy in home dept transferred