फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या दिवशी मुंबईतील एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मोठ्या पडद्यावर अंतिम सामना पाहण्यासाठी क्लबमध्ये गेलेल्या कुटुंबाचा आनंद क्षणात विरला. या कुटुंबासोबत सामना पाहायला गेलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा क्लबच्या पाचव्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हृद्यांश राठोड असं मृत पावलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचं नाव आहे. चर्चगेट परिसरातील गरवारे ब्लब हाऊसच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला आहे. क्लबच्या पायऱ्यांना संरक्षक काच नसल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

हेही वाचा- Mumbai Crime : मैत्रिणींच्या मदतीने पत्नीने पतीच्या प्रेयसीला संपवले, मृतदेहाची विल्हेवाट लावतानाचा प्रसंग सीसीटीव्हीत कैद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळ येथील रहिवाशी असणारे अवनीश राठोड हे आपला मुलगा हद्यांश, आई-वडील आणि इतर नातेवाईकांसह गरवारे क्लब येथे गेले होते. गरवारे क्लबमध्ये सहाव्या मजल्यावर मोठ्या पडद्यावर फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना दाखवण्यात येत होता. हा सामना सुरू असताना ३ वर्षीय हृद्यांश १० वर्षीय मुलासोबत पाचव्या मजल्यावर वॉशरुमसाठी गेला होता. वॉशरूमवरून परत येत असताना तो पाचव्या मजल्यावरून खाली पडला. या दुर्दैवी घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने त्याला बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा- मुंबई: १६ वर्षीय मुलीला ‘आयटम’ म्हणणं तरुणाला पडलं महागात, कोर्टाने सुनावली दीड वर्षांची शिक्षा

क्लबच्या पायऱ्यांना संरक्षक काच लावण्यात आली नव्हती, त्यामुळे हा अपघात घडला, असा आरोप मृत मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास मरीन ड्राइव्ह पोलीस करत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 year old minor died after falls from 5th floor in mumbai club during fifa world cup rmm