मुंबई: पावसाळ्यात डेंग्यू मलेरिया अशा साथजन्य आजारांनी राज्यात डोकं वर काढत असताना आता हिवाळ्यात झिका व्हायरस आजाराने भीतीचे वातावरण आहे. मात्र  ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजारांशी लढण्यासाठी विशेष खबरदारी घेत,  आरोग्य प्रशासनाने ठाणे जिल्हा रुग्णालयात झिका ग्रस्त रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन केला आहे. ३० बेडच्या अद्यावत कक्षा बरोबर औषध साठा, आपत्कालीन पॅरा मेडिकल टीम सज्ज ठेवण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे जिल्ह्यात थंडीचा संमिश्र अनुभव सर्वजण घेत असताना, बदलत्या हवामानामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णांत वाढ झालेली बघायला मिळते आहे. अशातच राज्यात ठिकठिकाणी झिका व्हायरसचा लोण वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सरकारकडून या साथीचा रोग पसरणार नाही यासाठी  खबरदारी घेतली जात आहे, झिका व्हायरस रुग्णांच्या उपचाराची उत्तम सोय सिव्हील रुग्णालयात करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>‘टेकफेस्ट’मध्ये रोबोद्वारे ‘डीजे कॉन्सर्ट’; जपानमधील ‘डीजे रोबोट’ प्रथमच भारतीयांच्या भेटीला

मुंबईत झिका व्हायरसची साथ पसरत असल्याचे सांगितले जात असल्याने ठाणे जिल्ह्यात झिकाची साथ पसरल्यास यावर त्वरित उपचार मिळणे आवश्यक आहे. यामुळे ३० बेड असणाऱ्या कक्षात उपचरासाठी लागणारी सर्व आयुधे सामुग्री सज्ज ठेवण्यात आली आहेत.

हेही वाचा >>>मालाडमध्ये प्राण्यांचे शवागार सुरू होणार; येत्या महिनाभरात सुविधा उपलब्ध करण्याचा पालिकेचा मानस

झिका व्हायरसची माहिती प्रसार माध्यमावर सांगण्यात येत असली, तरी खबरदारी म्हणून सिव्हील रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम सज्ज ठेवली आहे. डासांमुळे झिका व्हायरस पसरत असून, यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मात्र गर्भवती महिलांनी काळजी घेतली पाहिजे.- डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय ठाणे)

झिका विषाणू एडिस डासामुळे पसरतो. याची प्रामुख् लक्षण ताप, अंगदुखी, डोळे लाल होणे, पोटात दुखणे,  अशी काही लक्षणे आहेत. दोन ते तीन दिवस वरील काही लक्षणे दिसल्यास रक्त तपासणी करून वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार करावेत.- श्रीजीत शिंदे (वरिष्ठ फिजिशियन, जिल्हा रुग्णालय)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 30 bed updated ward at thane district hospital for treatment of zika patients mumbai print news amy