आबालवृद्धांबरोबरच सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम आणि मध्य उपनगरीय रेल्वे स्थानकात सरकते जिने बसवण्यात येत आहेत. नव्या वर्षातील पहिल्या तीन महिन्यात या दोन्ही मार्गावरील विविध स्थानकात एकूण ३० सरकत्या शिड्या बसवण्यात येणार असून त्यामुळे स्थानकातील प्रवास सुकर होणार आहे.
एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी काही प्रवासी रेल्वेरूळ ओलांडतात. गर्दीच्या वेळी पादचारी पूलही चढण्यासाठी लागणाऱ्या वेळांमुळे रुळ ओलांडण्याचा धोका पत्करताना अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे या घटना रोखण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिक, अपंग, गर्भवती महिला यांच्यासह सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी सरकते जिने आणि उद्वाहक बसविण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी मध्य रेल्वे मुंबई विभागात २० आणि पश्चिम रेल्वेवर मार्च २०२३ पर्यंत १० सरकत्या शिड्या बसविण्याचे नियोजन आहे. सध्या पश्चिम रेल्वे मुंबई विभागातील स्थानकात १०४ सरकत्या शिड्या आहेत. आणखी दहा शिड्या मार्च २०२३ पर्यंत बसवण्यात येणार असून त्यापैकी चर्नी रोड स्थानकात दोन, तर सांताक्रूझ, वांद्रे स्थानक, वांद्रे टर्मिनस, विलेपार्ले, वसई रोड, सफाळे, वाणगाव, घोलवड स्थानकात प्रत्येकी एक सरकता जिना बसविण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. मध्य रेल्वेवरही सध्या १११ शिड्या असून आणखी २० बसवण्यात येणार आहेत. भायखळा, विद्याविहार, विक्रोळी, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, ठाकुर्ली, इगतपुरी, कांजूरमार्ग स्थानकात प्रत्येकी दोन आणि आंबिवली, जिटीबी नगर स्थानकात प्रत्येकी एक सरकती शिडी आहे.
उदवाहकांची संख्या वाढणार
याशिवाय पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून उदवाहकांची (लिफ्ट) सुविधाही देण्यात येत आहे. सध्या पश्चिम रेल्वे मुंबई विभागात ५० उदवाहक असून मार्च २०२३ पर्यंत आणखी ६ उदवाहक सेवेत येतील. सांताक्रूझ, गोरेगाव, मालाड,बोरिवली, स्थानकात प्रत्येकी एक आणि नालासोपारात दोन उदवाहक प्रवाशांसाठी उपलब्ध केले जाणार आहेत. तर मध्य रेल्वे मुंबई विभागात ५६ उदवाहक आहेत. याशिवाय भायखळात तीन, पनवेल आणि मुंब्रात प्रत्येकी दोन तर जिटीबी, आटगाव, खर्डी, अंबरनाथ,इगतपुरी, चुनाभट्टी,टिटवाळा, वांगणी, भिवपुरी, वाशिंद, मुलुड,शिवडी, किंग्जसर्कल येथे प्रत्येकी एक उदवाहक याप्रमाणे एकूण २० उदवाहक उपलब्ध होतील.