मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.   राज्यामध्ये जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान स्वाईन फ्लूचे तीन हजार रुग्ण आढळून आले आहेत, तर २९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातही जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये अधिक रुग्ण आढळून आले असून, १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा >>> Mumbai Weather Update : पारा पुन्हा ३७ अंशांवर जाण्याचा अंदाज

Mig 29 crashes
Mig 29 Crasesh : भारतीय हवाई दलाचे मिग २९ लढाऊ विमान कोसळले; जमिनीवर कोसळताच आगीत भस्मसात!
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
over12 lakh citizens in maharashtra vaccinated against tuberculosis
राज्यामध्ये १२ लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे झाले क्षयरोग लसीकरण; मुंबईमध्ये अद्याप लसीकरण मोहीमेला सुरुवात नाही
NMC, safety doctors, medical colleges, doctors,
धक्कादायक! नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या पोटातून डॉक्टरांनी काढल्या तब्बल ६५ वस्तू; शस्त्रक्रियेदरम्यान झाला मृत्यू, पोटात आढळलं…
kudo millets elephants death
‘कोदो मिलेट’च्या सेवनाने तीन दिवसांत १० हत्तींचा मृत्यू; कारण काय? काय आहे कोदो मिलेट?
Yogi Adityanath Death Threat
Yogi Adityanath Death Threat: ‘योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या २४ वर्षीय तरुणीला ठाण्यातून अटक
Kishanganj Bihar
Kishanganj : बिहारच्या किशनगंजमध्ये गूढ आजाराने ३ मुलांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक, गावात पसरलं घबराटीचं वातावरण
Maharashtra winter updates
Winter News: नोव्हेंबरमध्ये अपेक्षित थंडी नाहीच; मध्य, दक्षिण भारतात जोरदार पावसाचा अंदाज

राज्यात हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना आता स्वाईन फ्लूचाही धोका वाढू लागला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत राज्यामध्ये स्वाईन फ्लूचे ३००३ रुग्ण आढळले. यामध्ये जानेवारी ते मे या पाच महिन्यांमध्ये १०५५ रुग्ण सापडले असून, १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एच१एन१चे ५३७ रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच एच३एन२ चे ५१८ रुग्ण आढळले असून, ७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांमध्ये १९४८ रुग्ण सापडले असून, १६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एच१एन१ चे ४९७ रुग्ण सापडले तर १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एच३एन२ चे सर्वाधिक १४५१ रुग्ण सापडले आहेत. यामुळे एच१एन१ चे आतापर्यंत २२ तर एच३एन२ ने सात जणांचा मृत्यू झाला आहे. दहा महिन्यांत राज्यात स्वाईन फ्लूचे १३ लाख ८८ हजार ३४२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. सध्या राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये ६२ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

एच३एन२ चे सर्वाधिक रुग्ण

दहा महिन्यांत राज्यात स्वाईन फ्लूचे १३ लाख ८८ हजार ३४२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. एच३एन२ चे सर्वाधिक १४५१ रुग्ण सापडले आहेत.