वाशी गावातील शांताराम सुतार यांची ३३ वर्षे जूनी दुमजली इमारत सोमवारी पडलेल्या संततधार पावसामुळे रात्री उशिरा खचल्याचे निर्दशनास आले. पालिकेच्या वाशी विभागाने आज सकाळी या इमारतीतील तीन कुटुंबियांना जवळच्या पालिका शाळेत सुखरुप हलविले. त्यानंतर ही इमारत पाडण्याचे काम सुरु करण्यात आले. मुंब्रा, ठाणे, भाईदर येथे इमारत पडण्याचे घटना घडत असल्याच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबईतील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट होण्याची गरज असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Story img Loader