मुंबई : मालवाहतुकीसाठी समर्पित असणाऱ्या ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’च्या कामासाठी हार्बर मार्गावर ३८ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर रोजी ११ वाजल्यापासून ते २ ऑक्टोबर दुपारी १ वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे बेलापूर – पनवेलदरम्यान एकही लोकल धावणार नाही. परिणामी, पनवेलवरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या – येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होण्याची. तसेच पर्यायी वाहन व्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> मुंबईत महिलेला घर नाकारलं, शिंदे गटातील मंत्री म्हणाले, “बहुतांश मराठी लोक मांसाहारी…”

डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या दोन नवीन अप आणि डाऊन मार्गिकांच्या बांधकामाबरोबरच पनवेल उपनगरीय रिमॉडेलिंग कामासाठी बेलापूर – पनवेलदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ३० तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी ब्लॉक कालावधीत हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील बेलापूर आणि पनवेल स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसतील. हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल सेवा बेलापूर, नेरूळ आणि वाशी स्थानकांवरून चालवण्यात येतील. ट्रान्सहार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल सेवा ठाणे आणि नेरूळ / वाशी स्थानकांदरम्यान धावतील.

Story img Loader