लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : स्थावर संपदा क्षेत्रातील दलालांच्या तिसऱ्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेला एकूण ४९५४ उमेदवार बसले होते, त्यापैकी ४४६१ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल ८९ टक्के लागला आहे. तीन परीक्षा मिळून आतापर्यंत ७६७८ उमेदवार दलाल म्हणून पात्र ठरले आहेत.
रेरा कायद्यानुसार विकासकांबरोबरच स्थावर संपदा क्षेत्राततील दलालांनाही महारेरा नोंदणी बंधनकारक आहे. त्यापुढे जाऊन महारेराने दलालांसाठी प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. त्यासाठी महारेराने प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र परीक्षा सुरु केल्या आहेत. त्यानुसार नुकतीच दलालांची तिसरी परीक्षा झाली. त्या परीक्षेला ४९५४ उमेदवार बसले होते. त्यापैकी ४४६१ यशस्वी झाले. त्यात ३८०३ पुरूष आणि ६५८ महिलांचा समावेश आहे. त्यातील २०० उमेदवार ज्येष्ठ नागरिक असून १० उमेदवारांनी सत्तरी ओलांडलेली आहे. तर दोन जण ८० वर्षांच्यावर आहेत. नागपूरचे एक उमेदवार तब्बल ८५ वर्षांचे आणि दुसरे पुण्याचे उमेदवार ८३ वर्षांचे आहेत.
आणखी वाचा-मुंबई महानगरपालिका रुग्णालयात भूमिगत कचरपेट्या बसवणार
या निकालात मुंबईच्या पल्लवी उपाध्याय, ठाण्याचे अनिलकुमार खंडेलवाल आणि रायगडचे सनी दुग्गल या तिघांनी ९८ टक्के गुण मिळवून संयुक्तपणे गुणानुक्रमे पहिले स्थान मिळवले आहे. दरम्यान पहिल्या परीक्षेचा निकाल ९६ टक्के, दुसर्या परीक्षेच्या निकाल ९३ टक्के तर तिसऱ्या परीक्षेचा निकाल ८९ टक्के लागला आहे. तिन्ही परीक्षांमधून आतापर्यंत ७६७८ उमेदवार दलाल म्हणून पात्र ठरले आहेत.