१ सप्टेंबर, २०११ ते २५ जून, २०१३ पर्यंत अनुदानास पात्र ठरविण्यात आलेल्या खासगी प्राथमिक शाळांमधील तब्बल ४,५७१ तुकडय़ांना राज्य सरकारने अखेर अनुदान मंजूर केले आहे. या निर्णयाचा फायदा या तुकडय़ांवर काम करणाऱ्या ५,२२१ शिक्षकांना होणार आहे. सरकारने आपल्या पुरवणी मागण्यांमध्ये या तुकडय़ांना ९३ कोटी ९७ लाख ८० हजार रुपये मंजूर केले आहेत.माध्यमिक शाळांमधील १७८ तुकडय़ांना सरकारने टप्प्याटप्प्याने ८ कोटी ५५ लाख ५ हजार रुपये अनुदान मंजूर केले आहे. पण, प्राथमिकच्या तुकडय़ांना अनुदान कधी मिळणार असा प्रश्न होता. पण, आता या शाळांमधील शिक्षकांना सरकारकडून वेतन मिळणार असल्याने त्यांचे शुल्क कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
जिल्हा प्रशिक्षण व शिक्षण संस्थांसाठी (डाएट) २७ कोटी ७ लाख ३ हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयाचे आमदार रामनाथ मोते यांनी स्वागत केले आहे.

Story img Loader