मुंबईतील मालाड येथे दोन गटांमधील वादातून सात वाहनं जाळल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. चार रिक्षा आणि तीन दुचाकींना अज्ञातांनी जाळले असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालाड पश्चिमेत बुधवारी रात्री दोन गटात वाद झाला होता. या वादातूनच पहाटे चार रिक्षा आणि तीन दुचाकी जाळल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे अग्निशमन दलाच्या वतीने सांगण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 auto rickshaws 3 motorcycles set ablaze in malad west after clash between two groups