बँकेतून बाहेर पडलेल्या एका हिरे व्यापाऱ्याची गाडी अडवून त्याच्याकडील चार लाख रुपये लुटल्याची घटना दहिसरमध्ये शनिवार दुपारी घडली. गाडीला रंग लागला आहे, असे सांगून व्यापाऱ्याची दिशाभूल करत त्याच्या गाडीतील रोख रक्कम असलेली बॅग पळवण्यात आली.
कांतिभाई सुजित्रा (५५) हे हिरे व्यापारी शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ते बॅंक ऑफ महाराष्ट्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. बँकेतून त्यांनी चार लाख रुपये काढले आणि बँकेच्या बाहेरील स्विफ्ट गाडीतून आपल्या घराकडे निघाले. त्यावेळी एका मुलाने आपल्या गाडीवर रंग लागले आहे, असे सांगितले. ते पुढे गेल्यानंतर शिवशक्ती कॉम्पेल्कस सिग्नलजवळ गाडी थांबली असता दुसरी गाडी जवळ आली आणि त्या मुलानेच रंग टाकल्याचे कांतिभाई यांना सांगितले. त्यामुळे कांतिभाई ते पाहण्यासाठी खाली उतरले. या संधीच्या फायदा घेत त्या इसमांनी कांतिभाई यांच्या गाडीतील चार लाख रुपये असलेली पिशवी लंपास केली.

Story img Loader