लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : टोरेस घोटाळ्यापाठोपाठ वित्तीय गुंतवणूक सल्ला सेवा पुरवणाऱ्या मनीएज ग्रुप ऑफ कंपनीजकडूनही गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक झाली असून या प्रकरणाच्या तपासाला आर्थिक गुन्हे शाखेने वेग दिला आहे. या फसवणूक प्रकरणातील ४ भूखंड आणि ८ सदनिकांवर गुन्हे शाखेने नुकतीच टाच आणली. हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा असल्याचा अंदाज आहे.

‘मनीएज ग्रुप ऑफ कंपनीज’अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या ‘मनीएज इन्व्हेस्टमेंट’, ‘मनीएज फायनकॉर्प’, ‘मनीएज रिअल्टर्स’, ‘मनीएज कॅपिटल सर्व्हिसेस’ या कंपन्यांकडून गुंतवणूकदारांना २४ टक्के दराने वार्षिक परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. मात्र, कंपनीने गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणात राजीव जाधव, हरिप्रसाद वेणुगोपाल, प्रणव रावराणे, प्रिया प्रभू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वेणुगोपाल आणि रावराणे यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर, पोलिसांना तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर प्रिया प्रभूला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. अन्य एकजण फरार आहे.

आणखी वाचा-टोरेस घोटाळ्यातील हवाला ऑपरेटरला अटक, २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

आर्थिक गुन्हे शाखेने श्रीवर्धन, पाली येथील ४ भूखंड आणि दिवा, बदलापूर आदी ठिकाणच्या ८ सदनिकांवर जप्ती आणली असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.