मुंबई: लहानांपासून थोरामोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांमध्ये श्रवण क्षमतेच्या आणि श्वसनाच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या कानठळ्या बसणाऱ्या आवाजामुळे श्रवण क्षमतेच्या समस्या तर आगमन सोहळा, विसर्जन सोहळा, मिरवणुकांदरम्यान फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे श्वसनांसंबंधी विकारांची वाढ होत आहे.

अशा समस्यांनी त्रासून रुग्णालयात भेट देणाऱ्या आठ रुग्णांपैकी चार ज्येष्ठ नागरिक, दोन प्रौढ आणि दोन तरुणांचा समावेश असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. त्याचप्रमाणे, फटाक्यांमधून सोडल्या जाणाऱ्या रसायनांच्या श्वासोच्छवासामुळे लोकांमध्ये ब्रॉन्कायटिस आणि दमा यांसारख्या श्वसनाच्या समस्या वाढतात.

poor sleep make your brain age faster
कमी झोपेमुळे मेंदू वेळेआधी वृद्ध होतो? नवीन अभ्यास काय सांगतो?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
system of hajari karyakarta has been dismantled
‘हजारी कार्यकर्ता’ यंत्रणा मोडीत?
pune city reasons to avoid firecrackers noise pollution during Diwali pune
कर्णसुखद की नेत्रसुखद!
MPSC has made an important change in Maharashtra Non-Gazetted Group B and Group C Services Examination
‘एमपीएससी’ गट- ‘क’ सेवा परीक्षा, निकालाबाबत मोठी बातमी, नवीन अर्जदारांसाठीही महत्त्वाचे
polling stations Pune district, Pune district remote areas, Pune, Pune latest news,
पुणे : जिल्ह्यातील ३८ मतदान केंद्रे दुर्गम भागात, ‘मोबाइल नेटवर्क’ही मिळेना
cash seized Maval, Maval, Pimpri, Maval latest news, Maval cash news,
पिंपरी : खेड शिवापूरनंतर आता मावळमध्ये १७ लाख ७५ हजारांची रोकड जप्त
Loneliness-Free Seoul
एकाकी मृत्यू म्हणजे काय? त्यांची संख्या का वाढतेय? ते रोखण्यासाठी कोट्यवधींची गुंतवणूक कशासाठी?

उत्सवादरम्यान असलेल्या मोठ्या आवाजामुळे श्रवणशक्ती कमी होते. यामुळे ऐकु येण्यात अडचणी, शब्दांचा चुकीचा अर्थ लावणे किंवा उच्च आवाजात वाजवलेली गाणी आणि व्हिडिओंचा आनंद न घेता येणे अशा समस्या आढळतात. कानाच्या आतील पेशींना झालेल्या नुकसानीमुळे तात्पुरता किंवा कायमचा श्रवणदोष निर्माण होऊ शकते. काही लोकांना टिनिटस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच कानात घंटी वाजणे, गोंधळ ऐकू येणे किंवा शिट्टी वाजणे असे आवाज येत राहतात.

हेही वाचा >>>मुंबई : गणेशोत्सवानिमित्त लोकलच्या २२ जादा फेऱ्या

सामान्यपणे ८० डेसिबलपर्यंतचा आवाज सहन होतो मात्र १०० ते १२० डेसिबलच्या आवाजामुळे कानावर दुष्परिणाम होऊ शकतो. अर्थात हा आवाज खुल्या मैदानात आहे की अरुंद गल्लीमध्ये आहे तसेच कितीवेळ आवाज सहन करावा लागला यावरही श्रवणशक्तीवर किती परिणाम होतो याचा विचार करावा लागेल असे जे.जे. रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ श्रीनिवास चव्हाण यांनी सांगितले. बंद खोलीत ८० डेसिबल आवाजाचाही श्रवणावर परिणाम होऊ शकतो असेही ते म्हणाले. गणेशमंडळांनी डिजे वाजवताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक असून किमान स्पिकर जरी उंचावर लावले तर लोकांना त्याचा कमी त्रास होईल असे डॉ चव्हाण म्हणाले. कानठळ्या बसणार्या आवाजामुळे श्रवणशक्तीवर निश्चित दुष्परिणाम होतो असेही ते म्हणाले.

मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील कान-नाक-घसा विकार तज्ज्ञ डॉ. प्रशांत केवले म्हणाले की, उत्सवादरम्यान मोठ्या आवाजामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे वेगवेगळ्या वयोगटातील लोकांच्या कानाचे नुकसान झाल्याचे दिसून येते. ध्वनी आणि वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येमुळे  तरुण, प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये श्रवण क्षमता आणि श्वसनाच्या समस्यांमध्ये ४० टक्के वाढ झाली आहे. फटाक्यांमधून सोडल्या जाणाऱ्या रसायनांच्या श्वासोच्छवासामुळे लोकांमध्ये ब्रॉन्कायटिस आणि दमा यांसारख्या श्वसनाच्या समस्या वाढतात. दररोज, आठ लोकांपैकी पाच ज्येष्ठ नागरिकांना श्वासोच्छवासाचा त्रास, दोन प्रौढांना (२५ ते ५५ वयोगट) छातीत घरघर आणि एका तरुणाला(वय २० ते २५ वयोगट) खोकल्याची समस्या उद्भवते. उत्सवादरम्यान ध्वनी आणि वायू प्रदूषण दोन्हीमुळे एखाद्याच्या जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो आणि दैनंदिन कामात व्यत्यय येतो. दारे आणि खिडक्या बंद करा आणि जास्त आावाज अथवा प्रदुषण असताना बाहेर न पडता घरी रहा.

हेही वाचा >>>मुंबई उच्च न्यायालयाकडून अटक वाॅरंटची बतावणी; सायबर चोरट्यांकडून एकाची १२ लाखांची फसवणूक

मुंबईतील झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील ईएनटी तज्ज्ञ डॉ. भाविक शहा म्हणाले की, सणासुदीच्या काळात डीजेच्या आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना खूप त्रास होऊ शकतो. या मोठ्या आवाजामुळे वृद्ध रुग्णांना मोठा आवाजाचा धक्का सहन न झाल्याने विविध समस्यांचा सामना करावा लागतो. ध्वनी प्रदूषणामुळे उच्च रक्तदाबासारख्या समस्या उद्भवू शकतात म्हणजेच हृदयावर येणाऱ्या ताणामुळे मायोकार्डियल इन्फेक्शन (म्हणजे हृदयविकाराचा झटका) किंवा स्ट्रोक होऊ शकतो. मोठ्या आवाजाच्या सतत संपर्कात राहिल्याने श्रवणशक्ती कायमची कमी होऊ शकते. मोठ्या आवाजामुळे कानाच्या आतील पेशींचे नुकसान होते. त्याचा परिणाम शरीरावरच नाही तर मनावरही होतो. त्यामुळे चिडचिडेपणा वाढून झोपेवरही विपरीत परिणाम होतो. आवाजामुळे गर्भवती महिलांमध्ये तणावाचा सामना करावा लागतो. याचा परिणाम आई आणि बाळ दोघांवरही होऊ शकतो.

डॉ शहा पुढे म्हणाले की, या आवाजावर सर्वोत्तम उपाय म्हणजे इअर प्लग वापरणे. स्पीकरच्या आवाजाच्या क्षेत्रात जास्त वेळ राहू नका. आपले कान ८० डेसिबलपर्यंतच आवाज सहन करू शकतात. सामान्य माणसाचे कान ७५ ते ८० डेसिबल आवाज सहन करू शकतात. गर्दीच्या ठिकाणी आपण ११० डेसिबलपर्यंतचा आवाज सहन करू शकतो. गणेशोत्सवाच्या आगमन व विसर्जन मिरवणुकीत ध्वनी व वायू प्रदूषण होणार नाही याची दक्षता गणेशोत्सव मंडळांच्या व्यवस्थापनाने घ्यावी. ज्या लोकांना हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे किंवा रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी जास्त आवाज असलेल्या ठिकाणी जाऊ नये. गर्भवती मातांनी डीजेच्या आवाजापासून दूर राहावे.