मुंबई : विमानतळाभोवती असलेल्या विलेपार्ले, सांताक्रूझ आणि कुर्ला या परिसरांतील ‘एअरपोर्ट फनेल’वासीयांना चार ते नऊ अतिरिक्त चटईक्षेत्रफळ देण्याच्या मुंबई महापालिकेने नगरविकास विभागाला पाठविलेला प्रस्ताव फलद्रुप होत नसल्याचे स्पष्ट झाल्यावर आता नव्या पर्यायाचा शोध सुरू करण्यात आला आहे. मात्र त्यामुळे एअरपोर्ट फनेलवासीयांच्या सुमारे चारशे इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे.

एअरपोर्ट फनेवासीयांच्या पुनर्विकासाचा प्रश्न नोव्हेंबर २०१६ मध्ये पहिल्यांदा उपस्थित करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत या प्रश्नावर फारशी प्रगती झालेली नाही. विलेपार्ले व सांताक्रूझ परिसरासाठी अनुक्रमे ४.४८ व ४.९७, तर कुर्ला परिसरासाठी ९.२२ चटईक्षेत्रफळ प्रस्तावित करणारा पर्याय पालिकेने तयार केला. मात्र या परिसरात इमारतीच्या उंचीवर बंदी असल्यामुळे हे चटईक्षेत्रफळ वापरता येणे शक्य नव्हते. या निमित्ताने निर्माण होणारा विकास हक्क हस्तांतर(टीडीआर) इतरत्र वापरण्याची मुभा देण्याचा प्रस्ताव होता. परंतु तो व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तो बारगळला.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
amit shah inaugurates 10000 newly formed multipurpose pacs
प्रत्येक गावात बहुउद्देशीय संस्थाच केंद्रीय सहकार मंत्र्यांची घोषणा, ३२ प्रकारच्या व्यवसायांची मुभा
mpsc students loksatta news
राज्यसेवा २०२४च्या जागावाढीसाठी विद्यार्थ्यांचे सरकारला साकडे, तहसीलदारासह अनेक पदे रिक्त
central minister nitin Gadkari
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर माफी, म्हणाले…
Navi Mumbai Police detained four Bangladeshi nationals living in rented room on Saturday
खारघरमध्ये चार बांगलादेशीय नागरीक ताब्यात

या इमारतींच्या पुनर्विकासासाठी वाढीव चटई क्षेत्रफळ मिळावे आणि इमारतींच्या पुनर्विकासासाठी चटई क्षेत्रफळ वजा जाता उर्वरित चटई क्षेत्रफळ टीडीआर स्वरूपात विकण्याची परवानगी देऊन बांधकामाचा खर्च निघावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात होती. नव्या विकास आराखडय़ात त्याबद्दल उल्लेख केला जाईल, असे सांगण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात हा विषय प्रलंबित ठेवण्यात आला. नव्या विकास नियंत्रण नियमावलीत विशेष तरतूद आणण्यास नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांनी विरोध केला. नव्या विकास नियंत्रण नियमावलीत हा परिसर ‘एअरपोर्ट फनेलबाधित’ म्हणून घोषित करावा, यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार, स्थानिक आमदार पराग अळवणी यांनी त्यावेळी प्रयत्न केले होते.

एअरपोर्ट फनेलम्हणजे काय?

सांताक्रूझ पूर्व-पश्चिम, विलेपार्ले पूर्व-पश्चिम, कुर्ला, घाटकोपर या उपनगरातील इमारतींना सांताक्रूझ आणि पवनहंस या विमानतळांचे फनेल झोन (विमानाचे उड्डाण आणि उतरण्याच्या मार्गावरील परिसर) लागू आहेत. या फनेलमध्ये येणाऱ्या इमारतींच्या उंचीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियम लागू आहेत. दोन ते तीन मजल्यांपर्यंतच उंचीची मर्यादा असल्यामुळे या इमारतींना लागू करण्यात आलेल्या एक चटई क्षेत्रफळात या इमारतींचा पुनर्विकास होणे अशक्य आहे. या इमारती जीर्ण झाल्या असून काही मोडकळीसही आल्या आहेत. स्वखर्चाने इमारतींचा पुनर्विकास करण्याची ऐपत नाही, अशा स्थितीत हे रहिवासी भरडले गेले आहेत.

Story img Loader