महापालिकेच्या विविध माध्यमाच्या १३१९ पैकी ४०० शाळांमध्ये व्हच्र्युअल क्लासरूम योजना राबविण्यात येणार असून त्यासाठी आणखी दोन स्टुडिओ कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीतही व्हच्र्युअल क्लासरूम सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
पालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी व्हच्र्युअल क्लासरूम योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  त्यानुसार गेल्या वर्षी ८० शाळांमध्ये ही योजना राबविण्यात आली. ही योजना विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरल्यामुळे ती अधिक प्रभावीपणे आणि सर्व शाळांमध्ये राबविण्याची मागणी भाजप नगरसेवक विनोद शेलार यांनी केली होती.
या योजनेचे यश लक्षात घेता यावर्षी ३६० प्राथमिक, तर ४० माध्यमिक शाळांमध्ये व्हच्र्युअल क्लासरूम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. शाळांची संख्या वाढल्यामुळे सध्याचे दोन स्टुडिओ अपुरे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या चार माध्यमांसाठी चार स्वतंत्र स्टुडिओ सुरू करण्याचा पालिकेचा मानस आहे. ते सकाळी ७.२० ते सायंकाळी ५.४० या वेळेत सुरू राहतील, असे पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.    

Story img Loader