मुंबई : शहरात करोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार दिसत असून शुक्रवारी दिवसभरात ४०२ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील एकूण करोनाबाधितांची संख्या ११ लाख ४५ हजार ४९७ वर पोहोचली आहे. शुक्रवारी मृत्यू झालेल्या तिन्ही रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यातील दोन रुग्णांचे वय ६० वर्षांहून अधिक होते, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली. तीन रुग्णांच्या मृत्युमुळे मुंबईत करोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १९ हजार ७०५ वर पोहोचली.
ठाणे जिल्ह्यात १७० जणांना संसर्ग
जिल्ह्यात शुक्रवारी १७० रुग्ण आढळले. यापैकी नवी मुंबई ६९, ठाणे ५४, कल्याण डोंबिवली २१, उल्हासनगर आठ, मीरा भाईंदर आठ, ठाणे ग्रामीण सात रुग्ण आढळले.