मुंबईः कांदिवलीतील एका वास्तुविशारदच्या घरी ४१ लाखांची चोरी करुन पळून गेलेल्या कर्मचार्‍याला सोमवारी कांदिवली पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. श्रीकांत चिंतामणी यादव असे या कर्मचार्‍याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीचा काही मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. तक्रारदार विवेक भोळे व्यवसायाने वास्तुविशारद असून ते कांदिवली परिसरात त्यांच्या कुटुंबियासह राहतात. त्यांच्या घरी तीन महिला घरकाम करतात. त्यांचे अंधेरीतील एमआयडीसी, पिनॅकल बिझनेस पार्कमध्ये एक खाजगी कार्यालय असून तेथेच श्रीकांत हा गेल्या बारा वर्षांपासून देखरेखीचे काम करीत होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> निवडणूक होणार आहे…हाच अंधेरी पूर्व पोटनिवडणूकतील प्रचाराचा प्रमुख मुद्दा

हेही वाचा >>> अंधेरी पोटनिवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस

विश्‍वासू कर्मचारी असल्याने त्याचे नेहमीच त्यांच्या घरी येणे-जाणे होते. दिड वर्षांपूर्वी त्यांच्या कपाटाच्या चाव्या गहाळ झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या पत्नीने श्रीकांतला दुसर्‍या चाव्या करून आणण्यास सांगितले. त्यानंतर त्याने दुसर्‍या चाव्या करून त्यांना दिल्या. तो कंपनीला कुठलीही पूर्वसूचना न देता 24 ऑक्टोबर रोजी गावी जातो असे सांगून निघून गेला. त्यानंतर तक्रारदार यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लॉकरमधील दागिने आणि रोख रक्कम काढण्यासाठी लॉकर उघडला. मात्र लॉकरमध्ये ४१ लाख रुपयांचे दागिने आणि रोख नव्हती. १६ ऑक्टोबर रोजी लॉकरमधील दागिन्यांची पाहणी केली होती. तेव्हा सर्व दागिने होते. मात्र नंतर दागिने आणि दोन लाखांची रोख चोरीस गेली होती. या चोरीमागे श्रीकांत यादवचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करुन त्यांनी कांदिवली पोलिसांत त्याच्याविरुद्ध तक्रार केली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी श्रीकांत यादवचा शोध सुरु केला. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला सोमवारी पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचा काही मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 41 lakh stolen house in kandivali employee theft arrested police crime news mumbai print news ysh