मुंबई : आकर्षक आणि पसंतीचा वाहन क्रमांक खरेदी करण्याकडे वाहनधारकांचा कल वाढला असून गेल्या सहा दिवसांत २३४ अर्जदारांकडून आकर्षक व पसंती क्रमांकासाठी ४१,७३,६३३ रुपयांचा महसूल वडाळा आरटीओला मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वडाळा आरटीओ येथे दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंदणी डिलर पॉईंट नोंदणी प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीद्वारे करण्यात येते. खासगी चारचाकी वाहनांची मालिका एमएच ०३ इएफ ही संपुष्टात आल्याने चारचाकी वाहनांसाठी एमएच ०३ इएल ही नवीन मालिका ६ फेब्रुवारी रोजीपासून सुरू केली. नव्या मालिकेचा आकर्षक व पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी वडाळा आरटीओकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी याला प्रतिसाद देत आकर्षक क्रमांक व पसंती क्रमांक मिळवण्यासाठी आरटीओ कार्यालयात येऊन अर्ज सादर केले. त्यानंतर पात्र अर्जदारांनी धनादेशाद्वारे आकर्षक व पसंती क्रमांकासाठीचे शासकीय शुल्क जमा केले. शासकीय शुल्काचा भरणा करुन अर्जदारांनी क्रमांक आरक्षित केले आहेत.आकर्षक व पसंतीच्या क्रमांकात विशेष करून ०००१ या क्रमांकासाठी चार लाख रुपये शुल्क भरून क्रमांक आरक्षित करण्यात आला. तसेच दीड लाखाचे शासकीय शुल्क असलेले दोन वेगवेगळे क्रमांक अर्जदारांनी विहित शुल्क भरुन आरक्षित केले. यासह ७० हजार रुपये, ५० हजार रुपये व इतर विविध प्रकारचे शुल्क दराने २२९ आकर्षक व पसंतीक्रमांक विहित शुल्क भरुन आरक्षित केले आहेत. एकूण २२९ क्रमांक आरक्षित करुन १२ फेब्रुवारीपर्यंत ३८,२२,५०० रुपयांचा महसूल जमा करण्यात आला.

हेही वाचा – १ मार्चपासून मुंबईत १० टक्के पाणी कपातीचा प्रस्ताव, राज्य सरकारने पाण्याचा राखीव साठा न दिल्यास पाणी कपात अटळ

हेही वाचा – ‘पती आईला वेळ-पैसे देतो’ म्हणून पत्नीने केली कौटुंबिक हिंसाचाराची केस; न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

एकाच क्रमांकाला एकापेक्षा जास्त अर्जदारांनी अर्ज केल्यास त्या वाहन क्रमांकाचे लिलाव करुन जो अर्जदार क्रमांकासाठी विहित केलेले शासकीय शुल्का व्यतिरिक्त, अतिरिक्त शुल्क जमा करावे लागेल, असे नागरिकांना कळवण्यात आले होते. याप्रकारे कार्यालयामध्ये ०९०१, ५०५०, ३३३३, ११११ व ६६९९ या पाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्जदारांनी क्रमांक आरक्षित करण्यासाठी अर्ज सादर केले होते. या पाच क्रमांकासाठी एकूण ११ अर्ज प्राप्त झाले होते. एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्याने या पाच क्रमांकाचा लिलाव करण्यात आला. त्या क्रमांकासाठी अर्जदारांनी अतिरिक्त शुल्क कार्यालयात जमा करुन क्रमांक आरक्षित केले आहेत. या पाच क्रमांकासाठी लिलावाद्वारे एकूण ३,५१,१३३ रुपये महसूल प्राप्त झाला. चारचाकी खासगी वाहनांसाठी वडाळा आरटीओकडून सुरू केलेल्या एमएम ०३ इएल या नवीन मालिकेतून २३४ अर्जदारांकडून आकर्षक व पसंती क्रमांकासाठी ४९,७३,६३३ रुपये इतका महसूल प्राप्त झाला, अशी माहिती वडाळा आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 41 lakhs revenue from preferred vehicle number mumbai print news ssb
Show comments