लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील स्थानकांच्या परिसरात २ हजार ९३१ झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. या वृक्ष लागवडीसाठी १२ कोटी १ लाख ६६ हजार १३६ रुपयांची तीन कंत्राटे देण्यात आली आहेत. या आकडेवारीनुसार एका झाडामागे ४१ हजार रुपये खर्च येणार आहे.

Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Reliance-Disney merger completed, Reliance-Disney,
रिलायन्स-डिस्ने यांचे ७०,३५२ कोटींचे महाविलीनीकरण पूर्ण
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
Brahmagiri Action Committees protest against hill climbing in front of Collectors office suspended
फिरत्या पथकाची आता खाणींवर नजर, वन विभागाच्या आश्वासनानंतर ब्रम्हगिरी कृती समितीचे आंदोलन स्थगित
Passenger service from Dadar to Ratnagiri stopped Mumbai news
दादरवरून थेट रत्नागिरी जाणारी पॅसेंजर सेवा बंद; प्रवाशांचे हाल

‘मेट्रो ३’ मार्गिकेच्या कामासाठी ३३.५ किमीच्या परिसरातील झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करावी लागली होती. हे प्रकरण न्यायालयात गेले होते. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने ३,७७२ झाडे हटविण्यास परवानगी दिली होती. मात्र प्रत्यक्षात ३,०९३ झाडेच हटविली असून ६७९ झाडे वाचविण्यात यश आल्याची माहिती एमएमआरसीएलकडून देण्यात आली. तसेच न्यायालयात एमएमआरसीएलने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचे पालन करत वृक्षारोपण करण्यात येत असल्याचे एमएमआरसीएलचे म्हणणे आहे. वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत ‘मेट्रो ३’वरील स्थानकांच्या परिसरात २९३१ झाडे लावली जाणार आहेत. त्यासाठी तीन कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण १२ कोटी १ लाख ६६ हजार १३६ रुपयांची तीन कंत्राटे देण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी या वृक्षारोपणासाठी अवाच्या सवा खर्च केल्याची चर्चा रंगली होती. मात्र ही चर्चा निराधार असून एका झाडामागे ४१ हजार रुपये खर्च येत असल्याची एमएमआरसीएलने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>>पीएनबी बँक घोटाळा : मेहुल चोक्सीचे पारपत्र निलंबितच राहणार, संबंधित कागदपत्रे मिळण्याची मागणी विशेष न्यायालयाने फेटाळली

तीन टप्प्यांत वृक्षारोपण

●पहिल्या टप्प्यात रोपवाटिकांमध्ये दोन हेक्टर क्षेत्रात निर्धारित कालावधीत ४६ सेंमी परिघापर्यंत झाडांची वाढ केली जाणार आहे.

●दुसऱ्या टप्प्यात रोपवाटिकांमधून झाडांचे मुंबईतील विशिष्ट ठिकाणी स्थलांतर करून स्थानक परिसरात रोपण केले जाईल.

●तिसऱ्या टप्प्यात वृक्षारोपणानंतर तीन वर्षे झाडांच्या देखभालीची जबाबदारी कंत्राटदारावर असेल. एखादे झाड मृत पावल्यास बदल्यात नवे झाड कंत्राटदाराला लावावे लागेल.