लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : मुंबई सेन्ट्रल टर्मिनस येथे रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईत ४१ लाख ९१ हजार रुपये मुंबई लोहमार्ग पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी प्राप्तिकर विभागाला माहिती देण्यात आली असून ते याबाबत पुढील तपास करत आहेत, असेही पोलिसांनी सांगितले.

land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
demand for ransom of Rs 2 crore case filed against three including Valmik Karad in kej
दोन कोटींच्या खंडणीची मागणी; वाल्मीक कराडांसह तिघांवर केजमध्ये गुन्हा
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
Central Railway security rescued 1099 children in 11 months with police and employee coordination
‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ ; रेल्‍वे सुरक्षा दलाने अकराशे मुलांची केली सुटका

मुंबई सेन्ट्रल टर्मिनसहून सुटणारी डाऊन १२९५३ ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसमधून एक प्रवासी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेऊन जाणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एच. टी. कुंभार व प्रभारी पोलीस निरीक्षक एम. एस. घरटे यांनी दोन पथके तयार केली. मुंबई सेंन्ट्रल रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेस आल्यानंतर पोलीस पथकाने प्रवाशांची तपासणी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी, बी-१ डब्यातील ७१ क्रमांक आसनावर बसलेला प्रवासी उसामा आसिम (२४) याच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात रबर पॅटमध्ये पाचशे, दोनशे व शंभर रुपयांच्या नोटा सापडल्या.

आणखी वाचा-भाजपाचा खेळ खल्लास! विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या कथित आरोपांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

त्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. त्यामुळे, उसामा याला फलाटावर उतरवून त्याच्याकडील ट्रॉली बॅगची दोन सरकारी पंचासमोर तपासणी करण्यात आली. त्यावेळी, त्यात ४१ लाख ९१ हजार रुपये आढळले. ते ताब्यात घेण्यात आले आहेत. विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने जप्त रोकडीबाबत निवडणूक भरारी पथक, प्राप्तिकर विभाग यांना माहिती देण्यात आली. आरोपी हा मुंब्रा परिसरातील रहिवासी आहे. सध्या प्राप्तिकर विभाग त्याची चौकशी करत आहे.

Story img Loader