दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन जवाहिरांना भरदुपारी रस्त्यात अडवून त्यांच्याकडील ४४ लाखांचे सोने लुटण्यात आले. घाटकोपरच्या छेडा नगर येथे शनिवारी दुपारी ही घटना घडली.
जवाहिर दीपेश जैन आणि भावेश संघवी हे दोघे शनिवारी दुपारी अॅक्टीवावरुन गोवंडी येथून कुर्ला येथे जात होते. रमाबाई आंबेडकर नगर येथून जात असताना त्यांच्या पाठलाग करीत आलेल्या होंडा सिटी गाडीतील एकाने अॅक्टीवा चालवित असलेल्या संघवी यांच्यावर दगड मारला. त्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांनी गाडीचा वेग कमी केला. त्यावेळी होंडा सिटीतून उतरलेल्या चौघांनी त्यांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांची गाडी पळवून नेली. अवघ्या काही मिनिटांत हा प्रकार
घडला. अॅक्टीवाच्या डिक्कीमध्ये दीड किलो सोने आणि पावणेदोन लाखांची रोकड ठेवली होती. लुटारुंनी एकूण ४४ लाख रुपयांचा ऐवज पळविल्याचे पोलिसांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा