मुंबई : नायगाव बीडीडी चाळीतील १२ बी, १३ बी, १४ बी, १५ बी, १६ बी, १९ बी आणि २२ बी या इमारतींमधील ४४२ पात्र रहिवाशांना म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून पुनर्विसित इमारतीतील घराची हमी दिली जाणार आहे. यासाठी सोमवार, २९ नोव्हेंबर रोजी सोडत काढण्यात येणार आहे. ही सोडत सोमवारी दुपारी ४ वाजता वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील गुलझारीलाल नंदा सभागृहात पार पडणार आहे. देखरेख समितीच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या सोडतीसाठी प्रत्येक इमारतीतील पाच सदस्यांना उपस्थित रहाता येणार आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर रहिवाशांना प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी रहिवाशांना एखादा पुरावा सोबत सादर करावा लागणार आहे.
मुंबई : नायगाव बीडीडीतील ४४२ पात्र रहिवाशांनामिळणार पुनर्वसित इमारतीतील घराची हमी; सोमवारी सोडत
‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर रहिवाशांना प्रवेश दिला जाणार आहे
Written by लोकसत्ता टीम
First published on: 26-11-2022 at 00:21 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 442 eligible residents of naigaon bdd chawls to get home guarantee in redevelopment building mumbai print news zws