मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस कोसळत असून आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ४५ टक्के पाऊस मुंबईत पडला आहे. गेल्यावर्षीची आकडेवारी पाहता गेल्यावर्षी जुलैच्या मध्यापर्यंत ३० टक्के पाऊस पडला होता. धरणक्षेत्रात मात्र पाऊस अद्याप कमी असून पाणीसाठा केवळ २९ टक्के आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत दरवर्षी पावसाळ्याच्या चार महिन्यांत मिळून सुमारे अडीच हजार मिमी पाऊस पडतो. या वार्षिक सरासरीचा विचार करता आतापर्यंत मुंबईत शहर आणि उपनगरात मिळून ४५ टक्के ११०० ते १२०० मिमी पाऊस पडला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्यजलमापक यंत्रावरील आकडेवारीनुसार जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत शहर भागात ११०४ मिमी, पूर्व उपनगरात ११६९ मिमी आणि पश्चिम उपनगरात ११६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रविवारीही मुंबईत दिवसभर पाऊस कोसळत होता.

हेही वाचा – शासकीय वैद्यकीय शिक्षणाचे दशावतार! प्राध्यापकांची ४५ टक्के पदे रिक्त, १४ ठिकाणी अधिष्ठाता नाहीत

हेही वाचा – मुंबई : पावसाचा जोर वाढल्याने वाहतूक सेवेवर परिणाम, कर्जत-चौक दरम्यान रेल्वे सेवा ठप्प

रविवारी सकाळच्या आकडेवारीनुसार शहर भागात सर्वाधिक पाऊस शीव प्रतीक्षा नगर (१३० मिमी) येथे पडला. तर संपूर्ण मुंबईत सर्वाधिक पाऊस अंधेरी पूर्व परिसरात (२०१ मिमी), पवई पासपोली (१९७ मिमी), दहिसर (१८४ मिमी), अंधेरी चकाला (१८० मिमी), मरोळ (१७७ मिमी), विक्रोळी टागोर नगर (१६४ मिमी) पावसाची नोंद झाली. तर सर्वात कमी पाऊस दक्षिण मुंबईत पडला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 45 percent of average rainfall in mumbai so far more rain than last year mumbai print news ssb
Show comments