मुंबई: मुंबईत सध्या नाकाबंदी दरम्यान मोठ्या प्रमाणात रोकड मिळत आहे. मुलुंड परिसरात गुरुवारी एका मोटारीत पोलिसांना ४७ लाखांची रोकड जप्त केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी सुरू आहे. मुलुंडमधील बी. आर. रोड परिसरात मुलुंड पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी नाकाबंदी केली होती. यावेळी एक मोटारगाडी तेथे आली. संशय आल्याने पोलिसांनी तत्काळ गाडी थांबवली. गाडीची तपासणी केली असता त्यात पोलिसांना ४७ लाख रुपये रोकड आढळली. पोलिसांनी ही रक्कम, गाडी आणि गाडीचालकाला ताब्यात घेतले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुलुंडमध्ये नाकाबंदी दरम्यान आढळली ४७ लाखांची रोकड
पोलिसांनी ही रक्कम, गाडी आणि गाडीचालकाला ताब्यात घेतले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 10-05-2024 at 11:01 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 47 lakh cash seized during nakabandi in mulund mumbai print news zws