मुंबई : चाकूचा धाक दाखवून पोटच्या पोरीवर अत्याचार करणाऱ्या ४७ वर्षीय आरोपीला वडाळा टी. टी. पोलिसांनी अटक केली. हा प्रकार कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी आरोपीने दिली होती. याप्रकरणी बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या पत्नीने स्वतः याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आरोपीने चाकूचा धाक दाखवून १५ वर्षांच्या पीडित मुलीवर डिसेंबर २०२४ पासून वारंवार बलात्कार केला. तसेच घडलेला प्रकार कोणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. शुक्रवारी पीडित मुलीच्या आईने पोलिसांना दूरध्वनी करून याबाबतच माहिती दिली. त्यानुसार पोलीस घरी पोहोचले असता तक्रारदार महिलेने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ६४, ६४ (२) एफ, ६५ (१), ३५१ (२), ३५१ (३), पोस्को कायदा कलम ४, ६ , ८, १२ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader