मंगल हनवते

मुंबई : कोकण मंडळातील रखडलेल्या घरांच्या सोडतीस अखेर मुहूर्त मिळाला आहे. या मंडळातील ४ हजार ७५२ घरांसाठी ११ एप्रिलला सोडत काढण्यात येणार असून त्यासाठी सोमवारी २० फेब्रुवारीपासून अर्जविक्री-स्वीकृती सुरू होणार आहे. आरटीजीएस, एनईएफटीद्वारे अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्याची अंतिम दिवस २० मार्च आहे. 

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
water cut in Thane on Friday Water supply will be provided in phases for two days
ठाण्यात शुक्रवारी पाणी नाही; काही भागात दोन दिवस टप्प्याटप्प्याने होणार पाणीपुरवठा
mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
29 villages, Vasai, Vasai latest news, Vasai marathi news,
वसई : २९ गावांचे प्रकरण तापले, सुनावणीची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप
CIDCO considers extending lottery process for 26 000 houses under My Favorite CIDCO House scheme
२६ हजार घरांच्या सोडत प्रक्रियेस मुदतवाढीचा प्रस्ताव विचाराधीन
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
29 villages Vasai Virar, Vasai Virar Municipal Corporation, Vasai Virar,
२९ गावांचा वसई विरार महापालिकेत समावेश, ३१ हजार हरकतींवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी

कोकण मंडळाकडून गेल्या कित्येक महिन्यांपासून सोडत काढण्याची तयारी सुरू आहे. यासाठी आतापर्यंत अनेक तारखा देण्यात आल्या, मात्र सोडतीला मुहूर्त मिळत नव्हता. आता मात्र  मंडळाने ४,७५२ घरांच्या सोडतीची तयारी पूर्ण करून वेळापत्रक अंतिम केले.  ठाण्यातील डॉ काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात ११ एप्रिल रोजी, सकाळी १० वाजता सोडत काढण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतील ९८४ घरे, २० टक्के योजनेतील १ हजार ५५४ घरे, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील १२९ घरे आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावरील २ हजार ८५ घरे अशी ही  घरे आहेत.

पंतप्रधान आवास योजनेतील अत्यल्प गटातील शिरढोणमधील ३४०, खोणीतील ६०, गोठेघरमधील २५६ आणि विरार-बोळिंजमधील ३२८ अशी एकूण ९८४ घरे सोडतीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या घरांच्या किमती अनुक्रमे  १४ लाख ९६,९३० रुपये, १७ लाख ६८,६५८, १७ लाख १५,१६४ आणि २१ लाख १५,७०६ रुपये अशा आहेत.

या सोडतीत २० टक्के योजनेतील अर्थात खासगी विकासकांकडून म्हाडाला उपलब्ध झालेल्या १,५५४ घरांचा समावेश आहे. त्यात वसई, विरार, ठाणे, पाचपाखाडी, डायघर, सानपाडा, घणसोली आदी परिसरातील घरांचा समावेश आहे. त्यात अत्यल्प, अल्प आणि मध्यम घरांचा समावेश असून अगदी साडे सात लाख रुपयांपासून ते तीस लाख रुपयांपर्यंत या घरांच्या किमती आहेत. या सोडतीत म्हाडा प्रकल्पातील सर्वात कमी केवळ १२९ घरे समाविष्ट आहेत. त्यात बाळकुममधील उच्च गटातील ३ घरांचा समावेश असून या घरांची किंमत ६० लाख ६० हजार ६८८ रुपये आहे. त्याचवेळी यात विरार-बोळिंजमधील अल्प गटातील ५९ घरेही समाविष्ट असून ही घरे २८ लाखांत विकली जाणार आहेत.

महत्त्वाच्या तारखा

  • ५ जानेवारीपासून नोंदणी सुरू 
  • अर्जवक्री – २० फेब्रुवारी, दुपारी १२ वाजल्यापासून
  • आरटीजीएस/एनइएफटीद्वारे अनामत रक्कम भरून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत- २० मार्च
  • स्वीकृत अर्जाची प्रारूप यादी- २९ मार्च
  • स्वीकृत अर्जाची अंतिम यादी –  ५ एप्रिल

Story img Loader