दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा होत असून गणेश चतुर्थीच्या दिवशी आगमन झालेल्या गणपतीची आणि त्यानंतर आलेल्या गौरीची षोडशोपचार पूजा केल्यानंतर सोमवारी भाविकांनी त्यांना निरोप दिला. मंगळवारी पहाटेपर्यंत गौरी-गणपतीचा विसर्जन सोहळा सुरू होता. मंगळवारी पहाटेपर्यंत एकूण ४८,०२९ गौरी-गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. करोनाविषयक कडक निर्बंध नसतानाही बहुसंख्य भाविकांनी गौरी-गणपतींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे पसंत केले. एकूण सुमारे १७ हजार ६१७ गौरी-गणपतींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेल्या दोन वर्षांमध्ये कडक निर्बंधांमुळे साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा लागला होता. अनेकांनी संसर्गाच्या भितीपोटी गणेशोत्सवात गणेशमूर्ती आणण्याऐवजी घरामधील देव्हाऱ्यातील गणपतीच्या मूर्तीची वा प्रतिमेची पूजा केली होती. त्यामुळे विसर्जनासाठी तुलनेत मूर्तींची संख्याही कमी होती. यावर्षी मात्र घरगुती गणेशमूर्तींची संख्या करोना पूर्व काळाइतकीच आहे. करोनापूर्व काळाप्रमाणेच यंदाही मुंबईत साधारण ४८ हजार गौरी-गणपतीचे विसर्जन झाले.

हेही वाचा : मुंबई : ताडदेव आरटीओच्या हेल्पलाईनवर १५ टॅक्सीचालकांविरोधात तक्रार ; ५ चालकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

दरवर्षी मुंबई महानगरपालिकेतर्फे गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उपलब्ध करण्यात येतात. मात्र कृत्रिम तलावांना गणेशभक्तांकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. टाळेबंदी व करोनाच्या काळात कृत्रिम तलावातच गणेश विसर्जन करणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यामुळे मुंबईतील कृत्रिम तलावांची संख्याही वाढवण्यात आली होती व त्यामध्ये मोठ्या संख्येने गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. यंदाही मुंबई महानगरपालिकेने मोठ्या संख्येने कृत्रिम तलाव उपलब्ध केले आहेत. मुंबईत एकूण ७३ नैसर्गिक विसर्जनस्थळे असून गेल्यावर्षी १७३ कृत्रिम तलाव उपलब्ध करण्यात आले होते. यंदा १६२ कृत्रिम तलाव उपलब्ध करण्यात आले आहेत. यंदा कडक निर्बंध नसतानाही पर्यावरणाचा विचार करून गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावतच करण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले होते. त्याला प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने घरगुती गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले.

हेही वाचा : तीन वर्षांनंतर मुंबईत मालमत्ताविषयक प्रदर्शनाचे आयोजन

मुंबईतील ठिकठिकाणच्या विसर्जनस्थळी सोमवारी गौरी-गणपती विसर्जन झाले. मंगळवारी पहाटे सहा वाजेपर्यंत एकूण ४८,०२९ गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये ४१,३४० घरगुती गणेशमूर्ती, ६२६० गौरी तर ४२९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचा समावेश होता. यापैकी १७,६१७ गौरी-गणपतींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. त्यात १५,२६५ घरगुती, २१७८ गौरी तर १७४ सार्वजनिक गणेशोशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीचा समावेश होता.