मुंबई: यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील ४८३ गावांवर दरडी कोसळण्याचा धोका असून धोकादायक दरडींची ठिकाणे सरकारने सबंधित जिल्हा प्रशासानाला कळवली आहेत. त्यानुसार रायगड, रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांना दरडी कोसळण्याचा सर्वाधिक धोका आहे. दरडींची ठिकाणे निश्चित करण्यात आली असून तेथे कुणाला हानी पोहचणार नाही, याची काळजी जिल्हा प्रशासनाने घ्यावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

हेही वाचा >>> छत्तीसगडच्या अबुझमाडमध्ये चकमक; आठ नक्षलवादी ठार, एक जवान शहीद

Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Ranthambore National Park 25 tigers missing
७५ पैकी तब्बल २५ वाघ गेल्या एक वर्षात बेपत्ता…रणथंबोरच्या जंगलात जे घडतेय…

राज्य सरकारने तयार केलेल्या अहवालानुसार राज्यातील डझनभर जिल्हयातील ४८३ गावांवर धोकादायक दरडींचे संकट आहे. त्यामध्ये रायगड जिल्ह्यात खालापूर, कर्जत, महाड, म्हसळा, पनवेल, पोलादपूर या तालु्क्यातील सर्वाधिक १५७ गावांचा समावेश असून त्याखालोखाल रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, दापोली, गुहागर, खेड, राजापूर, रत्नागिरी संगमेश्वर या तालुक्यातील १३८ तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, हवेली, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी या तालुक्यातील ९३ गावांना धोकादायक दरडींपासूनच्या आपत्तीचा धोका आहे.

साताऱ्यात जावळी, महाबळेश्वर, पाटण, सातारा, वाई या तालुक्यातील ८८, कोल्हापूरमधील भुदरगड, चंदगड, गगनबावडा, करवीर, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यातील ५८, नगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यील ८ , सिंधुदुर्गातील सावंतवाडी, वैभववाडी या दोन तालुक्यातील १६,नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, सुगरणा आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ५ गावांना पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असल्याचे अहवालात म्हटले आहे.

पावसाळ्यात राज्यातील काही जिल्ह्यात विशेषत: कोकण, मुंबई, पुणे, कोल्हापूर या भागात दरडी कोसण्याच्या घटना वारंवार घडत असतात, त्यामुळे काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ठाण्यात २२ ठिकाणे धोकादायक

ठाणे जिल्ह्यात अंबरनाथमधील खोड खुंटीवली, जांबिवली, मोरीवली, भिवंडीतील नागाव, तामघर, शहापूरमधील मोखावणे, ठाण्यातील उत्तण, बेलापूर, भाईंदरपाडा, माजिवडे, कोलशेत, शिरवणे, डोंगरी तर्फे धारावी, पारसिक, मुंब्रा आदी २२ ठिकाणी दरडींचा धोका दर्शविण्यात आला आहे.