ठाणे शहरातील कासार वडवली परिसरात कच-याच्या ढिगा-यामध्ये बुधवारी ५ दिवसांचं अर्भक आढळून आलं. कच-याच्या ढिगा-यातून ५ वर्षाच्या अर्भकाचा रडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर पोलिसांच्या मदतीने या अर्भकाला लोकांनी रुग्णालयात दाखल केलं. हे मुलीचे अर्भक असून तपासणीनंतर तिची प्रकृती चांगली असल्याचं डॉक्टरांतर्फे सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, कासार वडवली पोलिसांतर्फे अज्ञात व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अर्भकाला कचरा पेटीत कुणी टाकले यासंबंधी तपास सुरू आहे.

Story img Loader