मुंबई : नवी मुंबईमधील डीपीएस तलावाजवळ गुरुवारी पाच फ्लेमिंगो मृतावस्थेत तर, सात जखमी अवस्थेत आढळले. फ्लेमिंगोसाठी अवश्यक असलेल खाद्य तसेच पाणथळ जागा मुबलक प्रमाणात असल्यामुळे फ्लेमिंगो येथे वास्तव्यासाठी येतात.दरम्यान, या परिसरात आठवडाभरात मृत फ्लेमिंगोची संख्या आठवर पोहोचली आहे.

हेही वाचा >>> मुंबईत रविवार, सोमवार उष्णतेच्या लाटेचा इशारा; ठाण्यासह पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांनाही इशारा

fish die due to polluted water in miraj
मिरजेत प्रदूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत; मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलावातील घटना
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
jewellery shop employee dies in shooting
शहापूर हादरले! सराफाच्या दुकानातील कर्मचाऱ्याचा गोळीबारात मृत्यू
death of young man walking with a Jain Sadhvi in accident
जैन साध्वी सोबत चालत जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू
56 people rescued due to JNPA vigilance
जेएनपीएच्या सतर्कतेने ५६ जण बचावले; बचावकार्यात पायलट बोटीची महत्त्वाची भूमिका
child found dead in water tank in Bhiwandi
पाण्याच्या टाकीत पाच वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला
Nilkmal passenger boat case, Crime case Navy speedboat driver , Navy speedboat,
Nilkmal Passenger Boat Case: नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा
Tarun Bhati boating accident survivor doctors of St George Hospital
प्रवासी बोटीला जलसमाधी, नौदलाच्या ‘स्पीड बोटी’ची धडक; १३ मृत्युमुखी

डीपीएस तलावाजवळ गुरुवारी सकाळी फेरफटका मारायला गेलेल्या स्थानिकांना मृत फ्लेमिंगो दिसले.स्थानिकांनी घटनेची माहिती वनविभागाला देताच घटनास्थळी येऊन विनविभागाने मृत फ्लेमिंगोना ताब्यात घेऊन पनवेल येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. दरम्यान, पर्यावरणासाठी काम करणाऱ्या नॅटकनेक्ट फाउंडेशनने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या घटनेची चौकशी करण्याची तसेच नवी मुंबईतील जैवविविधते रक्षण करण्यासाठी योग्य पावले उचलण्याची विनंती केली आहे.मागील शुक्रवारी तीन फ्लेमिंगो मृत आणि एक जखमी अवस्थेत आढळून आले होते.

हेही वाचा >>> जिवंत बाळ जन्माला येऊ नये अशा पद्धतीने गर्भपात करण्यास परवानगी, बाळात दोष आढळल्याने याचिकाकर्तीची मागणी

नवी मुंबईत सक्रीय असलेल्या पर्यावरणप्रेमींनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि कांदळवन कक्ष यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले. दरम्यान, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक व्ही एस रामाराव यांनी घडलेल्या घटनेचा अभ्यास करण्यासाठी आणि पुढील कारवाई करण्यासाठी एक पथक घटनास्थळी पाठवले जाईस असे सांगितले. सेव्ह फ्लेमिंगोज अॅड मॅग्रोव्हज फोरमच्या रेखा सांखला यांनी डीपीएस तलावातील पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरु करण्याची विनंती नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडकोला केली आहे. कोरड्या पडलेल्या डीपीएस फ्लेमिंगो सरोवरात अन्न न मिळाल्याने पक्षी विचलित होत असण्याची शक्यता पक्षीप्रेमींनी वर्तवली आहे.

Story img Loader