साकीनाका भागातील एका कारखान्यात झालेल्या स्फोटामध्ये पाच जणांचा जीव गेला असून, तीन जण गंभीर जखमी झालेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. मात्र कारखान्यातील गॅसच्या स्फोट झाल्यामुळे तिथे आगीचा भडका उडाल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
स्फोटाचा आवाज आणि त्यानंतर लागलेल्या आगीमुळे तातडीने मुंबई महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीत सापडलेल्या सर्वांना लगचेच रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तिथे पाच जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. शुक्रवारी सकाळपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. या घटनेनंतर मुंबई पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले असल्याचे समजते. या घटनेत काही घातपाताचा कट होता का, याचीही तपासणी करण्यात येते आहे.

Story img Loader