बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार माहीम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश सोनावणे यांच्यासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. हिरे चोरी प्रकरणात आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याकडून ऐवज जप्त न करण्यात आल्याच्या आरोपावरून सोनवणे यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
या हिरे चोरी प्रकरणी काही ज्वेलर्सकडूनही सोनावणे यांच्यावर दोषारोप करण्यात आले होते. सोनावणे हे यापूर्वी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात होते. तेथे या हिरे चोरी प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता तसेच आरोपीला अटकही करण्यात आली होती. या पोलीस ठाण्यात असतानाच त्यांच्यावर ज्वेलर्स कडून दोषारोप करण्यात आले होते. अन्य निलंबित पोलिसांमध्ये उपनिरीक्षक भर्णे, हवालदार जाधव, केरे, कांबळे, पोलीस निरीक्षक अशोक सरमळकर आदींचा समावेश आहे.  

Story img Loader