भिवंडी येथील तरूणाच्या हत्येचा आरोप असलेल्या शांतीनगर पोलीस ठाण्यातील पाच पोलिसांना गुरूवारी निलंबित करण्यात आले आहे. या वृत्ताला सह पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी दुजोरा दिला. मात्र, याबाबतची माहिती तसेच निलंबित पोलिसांची नावे देण्यासाठी शांतीनगर पोलिसांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तसेच या प्रकरणी भिवंडीचे पोलीस उपायुक्त एम. के. भोसले यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  मौन बाळगले होते.  
ताडीच्या दुकानात झालेल्या वादातून सगीर फकीर कुरेशी (२०) या तरूणाला शांतीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यावेळी त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. ताडी विक्रेता आणि पोलिसांच्या मारहाणीत सगीरचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या आईने केला होता. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात ताडी विक्रेता आणि पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, सगीरच्या हत्येचा आरोप असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी. रोकडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक पगारे, पोलीस नाईक राजाराम घोडके, देवानंद चव्हाण आणि पोलीस हवालदार लहू गावित, या पाचजणांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Story img Loader