पाच वर्षीय मुलाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना धारावीत उघडकीस आली आहे. असलन उर्फ लकी अख्तर सिद्दीकी असे या मुलाचे नाव आहे. या मुलाच्या वडिलांनी ठेवलेल्या दोन भाडेकरूंनी ही हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. असलन सिद्दीकी (५) हा मुलगा आई वडिलांसह धारावीच्या नाईक नगर येथील बकरी मुल्ला चाळीत रहात होता.  त्यांच्या दुमजली घरात अल्लादिन आणि गुड्डू दोन तरूण गेल्या वर्षभरापासून भाडय़ाने रहात होते.  हे दोन्ही भाडेकरू टेलििरगचे काम करायचे. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास अलाद्दिनने असलनला दांडिया दाखविण्यासाठी नेतो असे सांगून घरातून घेऊन गेला. मुलगा घरी न परतल्याने वडिलांनी धारावी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसानंी त्वरीत तपास सुरू केला. परंतु अललनच्या वडिलांकडे या भाडेकरूंबाबत काहीच माहिती नव्हती. असलनचा शोध सुरू असताना गुरूवारी दुपारी दोन वाजता धारावीच्या पंप हाऊसच्या मोकळ्या जागेत असलनचा मृतदेह आढळला. दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा