खासगी बस कंपन्यांची वाढती स्पर्धा लक्षात घेऊन एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या मार्गावरील अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विनावातानुकूलित शयनयान आणि आसन व्यवस्था असलेल्या स्वमालकीच्या बस ताफ्यात दाखल केल्या आहेत. आता एसटी महामंडळाने फक्त शयनयान प्रकारातील विनावातानुकूलित ५० नवीन बस ताफ्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या बस केवळ कोकणात ‘रातराणी’ म्हणून प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा >>> ‘आरे’साठी उद्या पर्यावरणप्रेमींची ऑगस्ट क्रांती मैदान ते मंत्रालय यात्रा

Builders have an upbeat picture of rising home sales in the near future
पुण्या-मुंबईत घरांच्या खरेदीसाठी अच्छे दिन? बांधकाम क्षेत्र काय म्हणतंय जाणून घ्या…
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
insurance companies
आयुर्विमा कंपन्यांच्या पहिल्या हप्त्यापोटी उत्पन्नांत १४ टक्के वाढ, ‘एलआयसी’ची हिस्सेदारी ५८ टक्क्यांवर
6556 special trains on the occasion of Diwali Chhath Puja Mumbai news
दिवाळी, छठ पूजेनिमित्त ६,५५६ विशेष रेल्वेगाड्या
metro services
‘मेट्रो ३’ विस्कळीत, दोन दिवसांतच तांत्रिक अडचणी
Mumbai Rain | Maharashtra Rain| Mumbai Rain Updates,
मुसळधार पाऊस, दोन तास लोकल खोळंबली; महिला प्रवाशांनी कुठे उरकायचा नैसर्गिक विधी?
commuters demand refunds over cancellations of ac local train due to technical glitch
आमचे पैसे परत द्या! वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाड्यांतील पासधारक प्रवाशांची मागणी
st bus maharashtra, buses, ST, ST corporation,
आनंदवार्ता… ‘एसटी’च्या ताफ्यात आणखी २,५०० बसगाड्या येणार

खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांची वाढती स्पर्धा लक्षात घेऊन एसटी महामंडळाने काही वर्षांपूर्वी शिवशाही वातानुकूलित शयनयान बसगाड्या घेतल्या. या बस सेवेत आल्यानंतर जादा भाडेदरामुळे प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरवली होती. महामंडळाने त्यांच्या भाडेदरात कपात केली. मात्र त्यालाही प्रतिसाद मिळत नसल्याने ही सेवा बंदच करण्यात आली. त्यामुळे एसटी महामंडळाचा वातानुकूलित शयनयान प्रयोग पूर्णपणे फसला. वातानुकूलित बसगाड्यापाठोपाठ नोव्हेंबर २०१९ मध्ये एकाच बसमध्ये शयनयान आणि आसन व्यवस्था असलेली विनावातानुकूलित बस महामंडळाने घेतली. या स्वमालकीच्या बस सेवेला काही प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सध्या अशा २१८ बस ताफ्यात आहे. आता महामंडळाने केवळ शयनयान प्रकारातील ५० बस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली असून बससाठी लागणारा सांगाडा टाटा कंपनीकडून घेण्यात येईल आणि त्यानंतर एसटी महामंडळ त्याची बांधणी करणार आहे. मार्च २०२३ पर्यंत या बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल करण्याचा प्रयत्न असेल. त्यानंतरच या बस प्रवाशांच्या सेवेत येतील. लांब पल्ल्याच्या मार्गावर या बस ‘रातराणी’ म्हणून चालवण्यात येणार असून त्यासाठी कोकणातील मार्गांचाही विचार करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा >>> म्हाडाचे पशुवैद्यकीय आणि स्त्री रुग्णालय बारगळले; प्रतिसादाअभावी निविदा रद्द

सध्या राज्यात एसटीच्या २५६ मार्गांवर ५०० हून अधिक बसगाड्या ‘रातराणी’ म्हणून धावत असून यात साध्या, निमआराम, तसेच शयन आणि आसन व्यवस्था असलेल्या बसचा समावेश आहे. शयन आणि आसन व्यवस्था असलेल्या बसमध्ये ३० पुश बॅक आसन व १५ शयनयान अशी प्रवासी क्षमता आहे.