बुधवारी ‘१२-१२-१२’ चा मुहुर्त गाठण्यासाठी बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या असल्या तरी काही जणांच्या आयुष्यात हा योग नशिबानेच आल्याचे चित्र आहे. महानगरपालिकेच्या प्रमुख चार रूग्णालयांत ५० पेक्षा जास्त मुले यादिवशी जन्माला आली आहेत.
 मंगळवारी मध्यरात्रीनंतर ते बुधवारी रात्री १० पर्यंत महापालिकेच्या या ग्णालयांमध्ये ५१ मुले जन्माला आली असून त्यापैकी ३८ मुली तर ३३ मुलगे आहेत. त्यामुळे ‘१२-१२-१२’ च्या मुहुर्तामध्येही मुलींनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे दुपारी १२ वाजून १२ मिनिटांनी दोन स्त्रियांनी शस्त्रक्रिया करून दोन मुलांना जन्म दिला. केईएम रूग्णालयातही दोन जुळी मुले जन्माला आली आहेत. पंकज पटेल या व्यक्तीच्या बहिणीला बुधवारी मुलगी झाल्यामुळे त्यांनी त्या मुलीचे नाव ‘बारविया’ असे ठेवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा