लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : जेट एअरवेज गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) ५३८ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली. टाच आणण्यात आलेली मालमत्तांमध्ये जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल, कुटुंबीय व कंपन्यांच्या मालकीच्या निवासी सदनिका, बंगले आणि व्यावसायिक जागा अशा १७ मालमत्तांचा समावेश आहे. या मालमत्ता देशातील विविध राज्यांसह लंडन व दुबईमध्ये आहेत.

life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Hyderabad Airport Bomb Threat
‘बॉम्ब’चा टोमणा मुलीला महागात पाडला, विमानतळावर उडाली खळबळ; मेटल डिटेक्टरच्या आवाजामुळे गोंधळात भर
Maharashtra government financial burden
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?
LIC net profit falls to Rs 7621 crore print eco news
एलआयसीचा निव्वळ नफा घसरून ७,६२१ कोटींवर; बाजार वर्चस्वासह, हिस्सेदारी वाढून  ६१ टक्क्यांपुढे
Tata Motors profit falls 11 percent as vehicle sales decline
वाहनांची विक्री घसरल्याने टाटा मोटर्सच्या नफ्यात ११ टक्के घट;  दुसऱ्या तिमाहीत ३,३४३ कोटी रुपयांवर
State Bank quarterly profit of Rs 18331 crore
स्टेट बँकेला १८,३३१ कोटींचा तिमाही नफा

मेसर्स जेटएअर प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स जेट एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेड (जेआयएल) चे संस्थापक अध्यक्ष नरेश गोयल, त्यांची पत्नी श्रीमती अनिता गोयल आणि मुलगा निवान गोयल यांच्या मालकीच्या या मालमत्ता असल्याचे सूत्रांनी सांगितले. ईडीने याप्रकरणी नरेश गोयल यांच्यासह पाच जणांविरोधात मंगळवारी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. कॅनरा बँकेच्या कफ परेड येथील कॉर्पोरेट कार्यालयाद्वारे कर्ज सुविधा पुरवली होती. तक्रारीनुसार हा गुन्हा १ एप्रिल २००९ ते ५ जून २०१९ या काळात घडला. जेट एअरवेजचे खाते बँकेने ५ जून २०१९ मध्ये बुडीत घोषित केले होते. त्यानुसार ५३८ कोटी ६२ लाख रुपये बँकेकडे येणे बाकी असल्याने तेवढ्या रकमेचे बँकेचे नुकसान झाले. त्यामुळे बँकेद्वारे करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांच्या तपासणीत बँकेकडून देण्यात आलेला निधी इतर ठिकाणी वळवण्यात आल्याचे उघड झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

आणखी वाचा-मुंबई: पश्चिम रेल्वेवर ४, ५ नोव्हेंबर रोजी २४ तासांचा ब्लॉक

याप्रकरणात अज्ञात सरकारी अधिकाऱ्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी आरोपींना मदत केल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दिल्ली सीबीआयने भादंवि कलम ४०९, ४२०, १२० (ब) सह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम १३ (२), १३ (१) (क) व १३ (१) (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांच्या आधारे ईडी याप्रकरणी तपास सुरु केला होता. पुढे कर्ज बुडवल्याप्रकरणी ईडीने १ सप्टेंबरला नरेश गोयल यांना अटक केली होती. ईडीच्या तपासानुसार १० बँकांच्या समुहाचे सुमारे ६ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवण्यात आले आहे. न्यायवैद्यक लेखापाल परीक्षणात सल्लागार आणि व्यावसायिक शुल्काच्या नावाखाली सुमारे एक हजार १५२ कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. तसेच सुमारे दोन हजार ५४७ कोटी ८३ लाख रुपये जेट लाईट लिमिटेड या कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी वापरण्यात आल्याचा आरोप आहे.

गेल्या काही वर्षांत नऊ कोटी ४६ लाख रुपये नरेश गोयल यांच्या कुटुंबियांना देण्यात आले. त्यात गोयल यांची पत्नी अनिता गोयल, मुलगी नम्रता गोयल व मुलगा निवान गोयल यांच्या समावेश आहे. २०११-१२ ते २०१८-१९ या काळात विविध कारणे देऊन ही रक्कम कंपनीतून पाठवण्यात आली आहे. त्यामुळे परदेशातील काही कंपन्या, तसेच गोयल कुटुंबियांच्या मालमत्ता याबाबत ईडी तपास करत आहे.