मुंबई : राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून शनिवारी ५४२ नवे रुग्ण आढळले, तर एका बाधिताचा मृत्यू झाला.राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या चार हजार ३६० इतकी असून सध्या मृत्युदर १.८२ टक्के इतका आहे. राज्यात आढळलेल्या ५४२ नव्या रुग्णांमुळे आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या ८१ लाख ४९ हजार १४१ झाली आहे. तसेच आजपर्यंतच्या करोना बळींची संख्या एक लाख ४८ हजार ४५८ वर पोहोचली आहे.
करोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. राज्यात शनिवारी ६६८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत ७९ लाख ९६ हजार ३२३ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१२ टक्के आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या आठ कोटी ६६ लाख ९४ हजार ३०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१ लाख ४९ हजार १४१ (०९.४० टक्के) रुग्ण आढळले आहेत.