पोलिसांच्या सूचनेनुसार मोक्याच्या ठिकाणांवर आणखी साडेपाच हजार सीसीटीव्ही

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : पोलिसांनी सुचवलेल्या जागी शासनसाडेपाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहे. त्यामुळे शहरातील शासकीय सीसीटीव्हींची संख्या दहा हजारांवर जाईल. हे कॅमेरे २४ तास आपल्या टप्प्यातील हालचालीवर करडी नजर ठेवतील. त्यामुळे पोलिसांना संपूर्ण शहरावर नजर ठेवता येणार आहे.

२६/११ हल्ल्यानंतर शहरात सीसीटीव्हींचे जाळे उभारावे, त्याआधारे पोलीस, वाहतूक नियंत्रण कक्षातून शहरात एकाच वेळी नजर ठेवावी, हा विचार पुढे आला. पहिल्या टप्प्यात सुमारे साडेचार हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची उभारणी केली गेली. मुंबई पोलीस दलातून देण्यात आलेल्या माहितीनुसार प्रतिबंधात्मक आणि गुन्हा किंवा एखादी घटना घडल्यानंतरच्या चौकशी वा तपासात सीसीटीव्हींचा फायदा होतो.

सीसीटीव्हीत आपली कृती कैद होईल, पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील या भीतीने अनेक गुन्हेगार, समाजकंटक माघार घेतात. तसेच गुन्हा केल्यानंतर तेथून निसटलेल्या आरोपींची ओळख, त्याने निवडलेली दिशा आदी तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती मिळते. सीसीटीव्हींच्या मदतीने आजवर असंख्य गुन्ह्य़ांची उकल पोलिसांनी केली आहे.

या उपक्रमाच्या पुढल्या टप्प्यात शहरात आणखी साडेपाच हजार सीसीटीव्ही बसविण्यास मंत्रिमंडळाने अलीकडेच परवानगी दिली. प्रत्यक्षात हे वाढीव कॅमेरे कुठे बसवायचे यासाठीचे नियोजन खूप आधीपासून सुरू होते. पोलीस ठाण्यांच्या पातळीवर आपापल्या हद्दीत कुठे कॅमेरे बसणे जास्त उपयुक्त ठरेल याची माहिती घेण्यात आली. हद्दीतील संवेदनशील वास्तू, गर्दीच्या ठिकाणांसोबत महिला- बालकांविरोधातील गुन्हे, सोनसाखळी चोरी, वाटमारी, अपघात आदी गुन्हे घटना वारंवार घडणारी ठिकाणे निवडण्यात आली.

दुसऱ्या टप्पा पूर्ण होताच शहरातील सीसीटीव्हींचे जाळे अधिक भक्कम होईल. ज्या ठिकाणी सीसीटीव्हींची आवश्यकता आहे त्या ठिकाणांची निवड केल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

निवृत्त सहायक आयुक्त वसंत ढोबळे या उपक्रमात पोलीस दलाला मदत करत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील प्रत्येक मुख्य रस्त्याला अनेक गल्ल्या येऊन मिळतात. त्या प्रत्येक चौकावर दुसऱ्या टप्प्यात सीसीटीव्ही उभारले जाणार आहेत.

गल्लीबोळात गुन्हे करून आरोपी मुख्य रस्त्यावर येतो. तो, त्याच्या मार्गक्रमणाची दिशा कैद व्हावी, अचूक माहिती मिळावी हा त्यामागील उद्देश आहे. याशिवाय रेल्वे स्थानकांपर्यंत येणाऱ्या रस्त्यांवर, बाजारांप्रमाणे गर्दी खेचणारी ठिकाणे, प्रार्थनास्थळे, महत्त्वाचे उपक्रम किंवा कार्यालये आदी सर्व ठिकाणची सीसीटीव्हीची देखरेख अधिक बळकट करण्यात येईल. यातील काही सीसीटीव्ही वाहतूक नियमनासाठी तर उर्वरित कायदा व सुव्यवस्थेसाठी उभारले जाणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यात सीसीटीव्ही कुठे उभारावेत त्या जागांची निवड झाली आहे. आता त्या प्रत्येक जागेवर जास्तीत जास्त उपयोग व्हावा या दृष्टीने सीसीटीव्हीचा खांब कुठे उभारता येतील याची चाचपणी सुरू आहे.

सीसीटीव्हींचे चित्रण पोलीस, वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षात देण्यासाठी ऑप्टीमम फायबर, वीज जोडणी आदी पाहणी सध्या सर्वत्र सुरू आहे. ती पूर्ण करून सीसीटीव्ही उभारण्यासाठी अंदाजे वर्षभराचा काळ आवश्यक आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

उपलब्ध मनुष्यबळ खर्ची न घालता सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण शहरातील हालचाली टिपण्यात येणार आहेत. नियंत्रण कक्षात बसल्या जागी हे चित्रण दिसणार आहे. त्यामुळे दुसरा टप्पा पूर्ण होताच पोलीस दलाचे सामर्थ्य वाढणार आहे.

– मंजुनाथ सिंगे, प्रवक्ते, मुंबई पोलीस दल