लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: सलग सातव्या दिवशी बेस्टच्या खासगी बस पुरवठा कंत्राटदारांच्या कामगारांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे मंगळवारी सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण ५५१ बस आगारातच उभ्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना बेस्टच्या अनियोजित वेळापत्रकाचा सामना करावा लागला.

traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Assembly Election 2024 Extra Rounds of Best Bus on Polling Day Low floor deck buses will run for disabled elderly voters
मतदानाच्या दिवशी बेस्ट बसच्या जादा फेऱ्या; दिव्यांग, वृद्ध मतदारांसाठी ‘लो फ्लोअर डेक’ बस धावणार
Mumbai central railway block loksatta news
मुंबई: मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक
Night special local for the convenience of employees voters Mumbai news
कर्मचारी, मतदारांच्या सोयीसाठी रात्रकालीन विशेष लोकल धावणार
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका
London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मंगळवारीही सुरूच आहे. त्यामुळे बेस्टच्या २७ आगारांतील कारभारावर परिणाम झाला आहे. मंगळवारी ५५१ बसगाड्या आगारातच उभ्या होत्या. भाडे तत्त्वावरील एकूण ६४५ बस बेस्ट उपक्रमातील कायमस्वरूपी चालकांनी प्रवर्तित केल्या. परिणामी, एकूण बस ताफ्यातील ८२ टक्के गाड्या आगारांतून बाहेर पडल्या. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या एकूण २१० बसगाड्या बेस्ट उपक्रमाच्या बस मार्गांवर चालवण्यात आल्या.

आणखी वाचा-अदानी समुहाविरोधात उद्या हजारो धारावीकर रस्त्यावर, ऑगस्ट क्रांती दिनाच्यानिमित्ताने जाहीर सभा

बस पुरवठादार व्यवसाय संस्थेविरुद्ध कंत्राटातील अटी व शर्तीप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच त्यांना त्वरित त्यांच्या कामगारांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच राज्य शासनानेही संबंधित कंत्राटदारांना लवकरात लवकर बस सेवा पूर्ववत करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांना बस सेवा उपलब्ध व्हावी यासाठी बेस्ट उपक्रम मोठ्या संख्येने आपल्या बस चालकांच्या माध्यमातून जास्तीत जास्त बसगाडया प्रवर्तित करीत आहे, असे बेस्ट अधिकाऱ्यांनी सांगितले.