मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलाच्या परिसरात बुधवारी सकाळी एका डबलडेकर बसचा अपघात झाला. या अपघातात सहाजण जखमी झाले आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलातील मार्गावर डाव्या बाजूला बेस्टच्या बसेससाठी वेगळी मार्गिका तयार करण्यात आली आहे. आज सकाळी या मार्गावरून जात असताना एक डबलडेकर बस झाडावर जाऊन आदळली. या धडकेत डबलडेकरच्या वरच्या मजल्याचे मोठे नुकसान झाले असून बसमधून प्रवास करणारे सहा प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमींना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन अपघाताची चौकशी सुरू केली. हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा