मर्चन्ट नेव्हीमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमीष दाखवून ५० ते ६० जणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतील अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी उत्तर प्रदेशातून आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीने फेसबुक खात्याद्वारे ही फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा >>>मुंबई: आर्थिक घोटाळ्यातील झोपु प्रकल्पात ‘पुनर्वसना’वरील स्थगिती उठविण्याची मागणी; शासनाकडून सक्तवसुली संचालनालयाला पत्र 

Moneyedge Group financial scandal news in marathi
१०० कोटींच्या फसवणुकीबद्दल तक्रार ‘मनीएज’च्या दोन संचालकांना अटक; ‘टोरेस’नंतर आणखी एक घोटाळा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Investors in Dombivli cheated of 81 lakhs with false promise of 90 bungalow row house project
रो हाऊस प्रकल्पातील गुंतवणुकीतून, डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची ८१ लाखाची फसवणूक
Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
पिंपरी: खंडणीखोरांविरोधात आक्रमक; औद्योगिक तक्रार निवारण पथकामार्फत ११ गुन्हे दाखल
Four dead in Gujarat due to kite string injuries
नायलॉन मांजामुळे सात जणांचा मृत्यू; मुंबईत १९ जणांविरोधात कारवाई
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नायलॉन मांजाप्रकरणी मुंबईत १९ गुन्हे
Enforcement Directorate ED files Enforcement Case Information Report ECIR in Torres scam case Mumbai print news
टोरेस गैरव्यवहार प्रकरणः ईडीकडून गुन्हा दाखल, तपासाला सुरूवात; आतापर्यंत दोन हजार गुंतवणूकदांची ३७ कोटींची फसवणूक
mumbai police chief vivek phansalkar news in marathi
मुंबईतील वित्तीय, गुंतवणूक संस्थांची माहिती गोळा करा; मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचे आदेश

शुभम पितांबरलाल गुप्ता (२६) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपी उत्तर प्रदेशातील कानपूरमधील रहिवासी आहे. गुप्ताने फेसबुकवर व्ही. आर. मरिन या शिपिंग कंपनीच्या नावे खाते उघडले होते. त्याच्या आधारे त्याने व्ही. आर. मरिन या कंपनीत अधिकारी असल्याचे भासवून मर्चन्ट नेव्हीमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी ५० ते ६० लोकांची लाखो रुपयांची फसवणूक केली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर व्ही. आर. मरिन कंपनीने दिलेल्या तक्रारीवरून अंबोली पोलिसांनी भादंवि कलम ४१९, ४२० सह माहिती तंत्रज्ञान कायदा २००० कलम ६६ (क), ६६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा >>>तापसी पन्नू पहिल्यांदाच विनोदीपटात काम करणार

गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडोपंत बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राधेश्याम शर्मा व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ठाणगे यांनी तपासाला सुरूवात केली. पथकाने गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी तांत्रिक मदत घेतली. त्यानुसार आरोपी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे असल्याचे समजले. त्यामुळे तात्काळ कानपूरला पोलीस पथके रवाना झाली. पोलिसांनी आरोपीला राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीला स्थानिक न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाकडून ट्रांजिट रिमांड मिळवून आरोपीला मुंबईत आणण्यात आले. आरोपीकडून दोन मोबाइल जप्त करण्यात आले असून त्यापैकी एक क्रमांक गुन्ह्यात वापरण्यात आल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने फेसबुकवर लिंक देऊन ५० ते ६० जणांची लाखो रुपयांची फसवणूक केली असून त्याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader