अभियांत्रिकी पदवीबरोबरच यंदा पदविका अभ्यासक्रमाची अवस्थाही बिकट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा पदविका अभ्यासक्रमाच्या ६० हजारांहून अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पदवी अभ्यासक्रमाच्या सव्वा लाख जागांसाठी यंदा जेमतेम ९४ हजार अर्ज आले आहेत. पदविका अभ्यासक्रमाची स्थिती तर पदवीपेक्षाही वाईट झाली आहे. राज्यातील पदविकाधारकांना उद्योग क्षेत्रातून मागणी हळूहळू वाढते आहे. मात्र विद्यार्थ्यांनी पदविका अभ्यासक्रमाकडे पाठ वळवल्याचे दिसत आहे. दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. यंदा प्रवेशासाठी ८० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामुळे पदविका अभ्यासक्रमासाठी अधिक विद्यार्थी प्रवेश घेण्याची आशा महाविद्यालयांना वाटत होती. मात्र निश्चित झालेल्या अर्जामध्ये फारशी वाढ झालेली नाही. प्रवेशासाठी दोनदा मुदतवाढ देऊनही अर्जाची संख्या ही फारशी वाढली नाही. यंदा राज्यात पदविका अभ्यासक्रमाच्या एक लाख २० हजारापेक्षा अधिक जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी ६६ हजार ५८६ विद्यार्थ्यांचे अर्ज आहेत. या जागांसाठीची गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर होणार आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी साधारण २० ते २५ टक्के विद्यार्थी प्रत्यक्ष प्रवेश घेत नाहीत. त्यामुळे अर्जाच्या तुलनेत प्रवेशाच्या संख्येतही घट होते. त्यामुळे यंदा मोठय़ा प्रमाणावर जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. बारावीनंतरच्या औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट पदविका अभ्यासक्रमांसाठी साधारण गेल्यावर्षीप्रमाणेच अर्ज आले असून त्याची संख्या ६३ हजार ८५६ आहे.